तुरीच्या पिकात गाय आल्याने मारहाण
लातूर - तुरीच्या पिकात गाय आल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना देवणी येथील शिवारात घडली. याबाबत करिम ताहेरसाब शेख (रा. देवणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानन इब्राहिम शेख व अन्य दोघांविरुद्ध देवणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोहेकॉ. कांबळे अधिक तपास करीत आहेत.
रहदारीला अडथळा, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
लातूर - रहदारीला अडथळा होईल अशारितीने ( एमएच २४ एएफ २९०१) या क्रमांकाचा मिनी डोअर ऑटो रस्त्यावर चालू स्थितीत उभा केला. लातूर ते मुरुड जाणाऱ्या रोडवर ही घटना घडली. याबाबत दिलीप आबा सोनकांबळे (पोकाॅ. एमआयडीसी, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पीकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर - रहदारीला अडथळा होईल, अशा स्थितीत (एमएच १४ डीएम २४२१) या क्रमांकाचे पीकअप वाहन रहदारीला अडथळा होईल, अशा स्थितीत कासारशिरसी येथील शिराढोण रोडवर चालू स्थितीत उभा होता. याबाबत पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाले यांच्या फिर्यादीवरून सदर चालकाविरुद्ध कासारशिरसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालू स्थितीत वाहन रस्त्यावर केले उभे
लातूर - चालू स्थितीत कासारशिरसी येथील एका हॉस्पिटलसमोर वाहन उभे केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक रेवण ढमाले यांच्या फिर्यादीवरून (एमएच २४ एएफ २९०३) या क्रमांकाच्या वाहनचालकाविरुद्ध कासारशिरसी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.
माजी जिल्हाधिकाऱ्यांचा लातुरात सत्कार
लातूर - लातूर व्यापारी महासंघाच्या वतीने माजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा सत्कार तसेच नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचा स्वागत सोहळा २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ग्रँडच्या सभागृहात होणार आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचाही सत्कार होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर व्यापारी महासंघाचे प्रदीप सोलंकी यांनी केले आहे.