मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या करू नयेत, आपण नक्की जिंकू! : संभाजीराजे छत्रपती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 04:52 PM2020-10-01T16:52:37+5:302020-10-01T17:06:43+5:30

Maratha reservation, not commit suicide, Sambhaji Raje Chhatrapati मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन केलं आहे.

Young people should not commit suicide for Maratha reservation, we will definitely win! : Sambhaji Raje Chhatrapati | मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या करू नयेत, आपण नक्की जिंकू! : संभाजीराजे छत्रपती 

मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या करू नयेत, आपण नक्की जिंकू! : संभाजीराजे छत्रपती 

Next
ठळक मुद्दे मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या करू नयेत, आपण नक्की जिंकू! : ट्विटरच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांचे मराठा समाजाला आवाहन

कोल्हापूर: मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही, अशा शब्दात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरच्या माध्यमातून मराठा समाजाला आवाहन केलं आहे.

'विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली!' अशा शब्दात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या विवेक राहाडे या विद्यार्थ्याला खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी श्रद्धांजली वाहिली. 

ट्विटरवरून संभाजीराजे छत्रपती यांनी  'लढून मरावं, मरून जगावं हेच आम्हाला ठावं', असे पोवाडे गाणारा हा समाज आहे हे लक्षात ठेवा. आत्महत्येसारखे पर्याय निवडू नका,' असे आवाहन करत मराठा समाजाला  खचून न जाण्याचं आवाहन केलं आहे. 'माझ्या निडर वाघांनो तुम्हीच असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. हा लढा सुरू असताना कुणीही आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'आज परिस्थिती आपल्या विरोधात वाटत असली, समोर अंधार दिसत असला तरी उद्या नक्की पहाट होईल. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. सर्व काही ठीक होईल. आपण लढाई जिंकूंच,' असा विश्वास त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

Web Title: Young people should not commit suicide for Maratha reservation, we will definitely win! : Sambhaji Raje Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.