शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

चुकीचे धरण, चिकोत्रावासीयांचे मरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:51 IST

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज ...

चिकोत्रा खोऱ्यात पिण्यासह शेतीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवत आहे. या खोºयाच्या वाट्याला झुलपेवाडी व नागणवाडी हे दोन प्रकल्प असतानाही शेतकरी आणि नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडून रस्त्यावर उतरावे लागत आहे. गेल्या २० वर्षांपासून भेडसावणाºया या प्रश्नाकडे शासनस्तरावर गांभीर्याने घेतलेच नाही. याबाबत वेदना मांडणारी मालिका आजपासून...वेदना चिकोत्रा खोºयाच्या...दत्तात्रय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : चिकोत्रा खोºयातील ३५ गावांची जीवनदायिनी म्हणून चिकोत्रा नदी मानली जाते; परंतु या नदीवर बांधण्यात आलेले चिकोत्रा (झुलपेवाडी) धरण पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केल्यामुळे पूर्ण क्षमतेने भरतच नाही. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याची समस्या पाचवीलाच पुजलेली आहे.धरणाच्या पूर्ततेनंतर चिकोत्रावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर गावी गेलेल्यांना गावाकडची ओढ लागली आणि ते परतलेही. मात्र, त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.१९९६ मध्ये चिकोत्रा खोºयातील पाण्याचे दुर्भिक्ष पाहून प्रशासनाने झुलपेवाडी (ता. आजरा) येथे चिकोत्रा धरणाची उभारणी केली. मात्र, अत्यल्प पाणलोट क्षेत्रामुळे हे धरण अतिवृष्टीची दोन वर्षे वगळता पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. परिणामी उन्हाळ्यात येथील नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.गावाकडे परतलेल्यांना मनस्ताप३५ गावांतील अनेक लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, इचलकरंजी, पुणे कोल्हापूरसह अनेक औद्योगिक वसाहतीमध्ये जात होते. २००० साली हे धरण पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या. शेतीवाडी करून संसाराचा गाडा हाकायचा या हेतूने अनेकजण परतलेही. मात्र, चिकोत्राचे पाणी म्हणजे मृगजळच ठरल्याने त्यांना मनस्ताप होत आहे.पाणी विकतघेण्याची वेळ...धरणातील दर महिन्यातून एकदा सोडण्यात येणारे पाणी नदीच्या उथळपणामुळे लगेचच वाहून जाते. केवळ ४ ते ८दिवसांत नदी कोरडी पडते. यानंतर २० ते २२दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर अनेक गावांत १००० ते ३००० लिटर पाण्याची टाकी ५०० ते ७०० रूपये देऊन विकत घ्यावी लागते. त्यामुळे रोजगाराच्या संधी नाहीत. शेतीतून उत्पादन नाही. यामुळे चिकोत्रावासीयांत कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहेउपलब्ध पाण्याचेनियोजनही ढिसाळ...धरणामध्ये दरवर्षी उपलब्ध होणाºया ५० ते ६० टक्के पाण्याचे नियोजन करतानाही पाटबंधारे, वीजवितरण अधिकाºयांमध्ये समन्वय नसतो. धरणातून सोडलेले पाणी बेळुंकीपर्यंत पोहोचविण्यासाठी उपसाबंदी लागू असते. मात्र, बहुतांशी पंपधारक जनरेटर, सिंगल फेजचा अवलंब करून पाणी उपसा करतात. परिणामी अनेक गावांत पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त होते. याबाबतही गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.चिकोत्रा धरणाचा सर्व्हे करताना येथील पर्जन्यमान, जलस्रोत यासंबंधी चुकीचा सर्व्हे केला. या अधिकाºयांनी शासन व शेतकरी यांची फसवणूकच केली आहे. तरीसुद्धा आज आम्ही पाणलोट क्षेत्रातील काही जलस्रोत बळकट करण्यासंबंधी उपाययोजना सुचविल्या आहेत व त्याकरिता लोकचळवळ उभी करीत आहोत. त्यामुळे शासनाने लोकभावनेचा आदर करून सर्व मागण्या मान्य कराव्यात. - कॉ. संभाजी यादव, किसान सभा अध्यक्ष, कागल तालुका