Dasara-खंडेनवमीदिवशी सोनगेत शिवकालीन नाणी व शस्त्रास्त्रांचे पुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:56 PM2020-10-26T17:56:02+5:302020-10-26T18:00:21+5:30

Dasara, kolhapurnews सोनगे(ता.कागल)येथिल अभियंता अमर मारुती पाटील यांनी शिवकालीन २५० शस्त्रास्त्रे व छत्रपतीची राजमुद्रा असणाऱ्या एक हजार नाण्यांचा संग्रह केला आहे. खंडेनवमीदिवशी या पुरातन शिवकालिन नाणी,शस्त्रांचे पुजन त्यांनी आपल्या घरीच केले होते.

Worship of Shiva coins and weapons in Songet | Dasara-खंडेनवमीदिवशी सोनगेत शिवकालीन नाणी व शस्त्रास्त्रांचे पुजन

सोनगे येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे पुजन करताना अमर पाटील (छाया- रोहित लोहार, सोनगे)

Next
ठळक मुद्देखंडेनवमीदिवशी सोनगेत शिवकालीन नाणी व शस्त्रास्त्रांचे पुजनशिवप्रेमींंची उपस्थितीः २५० शस्त्रास्त्रे,हजार नाणी

दत्ता पाटील

म्हाकवे/कोल्हापूर - सोनगे(ता.कागल) येथिल अभियंता अमर मारुती पाटील यांनी शिवकालीन २५० शस्त्रास्त्रे व छत्रपतीची राजमुद्रा असणाऱ्या एक हजार नाण्यांचा संग्रह केला आहे. खंडेनवमीदिवशी या पुरातन शिवकालिन नाणी,शस्त्रांचे पुजन त्यांनी आपल्या घरीच केले होते. ही शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली.

शिवकालीन दैनंदिन जीवनातील व्यावहारिक नाणी, लढाईतील तलवारी, दोरखंड, कट्यार, तोफगोळे, भाले, वाघनख्या, आदी शस्त्राअस्त्रासह गड कोटावर दरवाजांसाठी वापरात असणारी वेगवेगळी कुलुपे, ढाली, बिछवा तसेच इसवी सन 1400 पासुन ते आजतागायत सर्व नाणी यांचे पुजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबर त्यावेळचे व्यवहार,शस्त्रास्त्रांची माहिती भावी पिढीला समजावी.या हेतूने दहा वर्षे महाराष्ट्रसह इतरत्र फिरून शस्त्र अणि नाण्यांचा संग्रह केला. अनेक ठिकाणी शस्त्र प्रदर्शनाचे आयोजनही केले. याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

महाराष्ट्रासह देशभरात हा इतिहास पोचवण्याचा मानस असून हा अनमोल ठेवा जपणार आहे.
-अमर पाटील,
सोनगे.

Web Title: Worship of Shiva coins and weapons in Songet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.