वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा : खासदार संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 04:03 PM2020-10-20T16:03:15+5:302020-10-20T16:07:18+5:30

forest department, sanjay mandlik, kolhapurnews वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीसंदर्भात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वनमंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेण्याचा निर्णय सोमवारी येथे झाला. खासदार संजय मंडलिक यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. त्या बैठकीस चंदगडचे आमदार राजेश पाटील व राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विजय देवणे, सुनील शिंत्रे, नगरसेवक संभाजी पाटील उपस्थित होते.

Wildlife should be taken care of immediately: MP Sanjay Mandlik: Meeting at Mantralaya next month | वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा : खासदार संजय मंडलिक

कोल्हापुरात सोमवारी खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाच्या कायार्लयात बैठक झाली. त्यास आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विजय देवणे, सुनील शिंत्रे, नगरसेवक संभाजी पाटील उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देवन्यप्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा : खासदार संजय मंडलिक पुढील महिन्यांत मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीसंदर्भात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वनमंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेण्याचा निर्णय सोमवारी येथे झाला. खासदार संजय मंडलिक यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. त्या बैठकीस चंदगडचे आमदार राजेश पाटील व राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, विजय देवणे, सुनील शिंत्रे, नगरसेवक संभाजी पाटील उपस्थित होते.

मंडलिक म्हणाले, वन्यप्राण्यांचा अधिवास हा मानव वसाहतीकडे वाढत असून, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीवित व पीक हानी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्या बदोबस्त व झालेल्या नुकसानीची भरपाई होण्याची गरज आहे.

चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत नागरी वसाहतींमध्ये हत्ती फिरत असल्याने तातडीने उपाययोजना व्हाव्यात याकरिता आजरा तालुक्यातील हत्ती कर्नाटक पॅटर्न वापरून परत पाठविणे व कर्नाटकातून चंदगडमध्ये येणारे हत्ती यांचा वायर फ्लेमिंग उभे करून प्रतिबंध करणे, हत्ती, गवे व इतर जनावरांमुळे होणारे शेतीचे नुकसान बाजारभावाप्रमाणे देणे असे महत्त्वाचे निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आले. यासाठी समन्वय करण्याची जबाबदारी मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांच्यावर सोपविण्यात आली.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • कर्नाटकातील पाळीव हत्ती आणून आजऱ्यातील हत्तीला कर्नाटकात पाठविणे.
  • कर्नाटकातून येणाऱ्या हत्तींना रोखण्यासाठी खिंडीतील मार्ग वाघोत्रे-गुडवळे चंदगड येथे वायर फ्लेमिंग करणे
  • तमिळनाडूच्या धर्तीवर उपाययोजना राबवाव्यात
  • शेतीमालाचे होणारे नुकसान बाजारभावाप्रमाणे मिळण्यासाठी पाठपुरावा

 

Web Title: Wildlife should be taken care of immediately: MP Sanjay Mandlik: Meeting at Mantralaya next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.