शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
7
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
8
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
9
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
10
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
11
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
12
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
13
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
14
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
15
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
16
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
17
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
18
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

एक कोटीची झाडे गेली कुठे ? ‘अमृत योजना’ : तज्ज्ञांना डावलून कोट्यवधीच्या निधीची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:23 IST

कोल्हापूर : ‘अमृत’ योजनेअंतर्गत २०१५-१६ साली कोल्हापूर महापालिकेने एक कोटी रुपयांची झाडे लावली. पुढच्याच वर्षी यासाठी एक कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. याच निधीतून सध्या झाडे लावली जात आहेत.

समीर देशपांडे ।कोल्हापूर : ‘अमृत’ योजनेअंतर्गत २०१५-१६ साली कोल्हापूर महापालिकेने एक कोटी रुपयांची झाडे लावली. पुढच्याच वर्षी यासाठी एक कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले. याच निधीतून सध्या झाडे लावली जात आहेत. आता नव्या आर्थिक वर्षात शहरामध्ये पाच ठिकाणी दोन कोटी रुपये खर्चून झाडे लावण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. मात्र हे करताना कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याच अंतर्गत कार्यरत असलेल्या वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समितीमधील तज्ज्ञांचा सल्लाच घेतला नसल्याचे पुढे आले आहे.

या योजनेतून पहिल्याच वर्षी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र केंद्र शासनाने हा निधी मंजूर करताना तो कसा खर्च करावा याचे काही निकष दिले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे महापालिकेने पुईखडी, जयंती नाल्याच्या उतारावर, झूम प्रकल्पावर, विविध स्मशानभूमींमध्ये झाडे लावून हा निधी खर्च केला. सध्या या जागांवर किती झाडे आहेत, हे पाहायला गेले तर मात्र वास्तव वेगळेच दिसते.

सध्या टेंबलाई, साळोखेनगर आणि बेलबाग येथे जी कामे सुरू आहेत त्यांसाठी एक कोटी ६२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आता तर नव्या आर्थिक वर्षात आणखी पाच ठिकाणी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्यात येणार आहेत. रंकाळा (१ कोटी), सह्याद्रीनगर (२९ लाख), टाकाळा (लाख), ( पान ४ वर)महापालिकेचा खुलासाहे उद्यान नसून वृक्षवन आहे, राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रकल्पाला मान्यता आहे. प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी वृक्षलागवडीवर ५० टक्के, ३० टक्के लहान झाडे व वेलींसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. सिव्हिल वर्क २० टक्क्यांपेक्षा कमी खर्चाचे करावयाचे आहे. झाडांसाठी निकषांनुसार खड्डे काढले असून, त्यानुसार १/३ भाग जुनी माती भरून झाडे लावली आहेत. ९५ टक्के झाडे देशी प्रजातींची आहेत. दोन झाडांमधील अंतर चार ते पाच फूट आहे. ही वृक्षवने हवामान बदलाची तीव्रता कमी करण्यासाठी आहेत. टेंबलाई येथे हा बदल झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.खुलाशातील दावेही चुकीचे‘लोकमत’मध्ये मंगळवारी (दि. ३) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधीक्षकांच्या स्वाक्षरीने खुलासा पाठविला आहे. त्यामध्ये प्रत्येक झाडामध्ये चार ते पाच फुटांचे अंतर असल्याचा आणि अडीच बाय तीन फुटांचा खड्डा काढल्याचा दावा केला आहे. मात्र बेलबाग आणि टेंबलाई परिसरातील साईटला भेट दिल्यानंतर हे दोन्ही दावे निखालस खोटे असल्याचे स्पष्ट होते. 

महापालिकेमध्ये वृक्ष प्राधिकरण आणि जैवविविधता समिती कार्यरत आहे. मात्र तीन ठिकाणी ही वने विकसित करताना डॉ. मधुकर बाचूळकर व अन्य सदस्यांचे मार्गदर्शन घेऊन झाडे लावावीत, अशी स्पष्ट सूचना आयुक्तांनी केली असताना थेट झाडे लावल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली आहे.- उदय गायकवाड, कोल्हापूर महा. वृक्ष प्राधिकरण सदस्य