शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळला नदी प्रदूषणातून मुक्ती केव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:04 IST

संदीप बावचे।लोकमत न्यूज नेटवर्कगेल्या अनेक वर्षांपासून नदीक्षेत्रात वाढलेले औद्योगीकरण, शहरातील सांडपाणी यामुळे वरदान ठरलेली पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी शाप ठरली आहे. नदी प्रदूषणावर प्रत्येक वर्षी आंदोलने होत असतात, जनहित याचिका दाखल झाली आहे. मात्र, लोकांच्या जिवावर उठलेले पाणी प्रदूषणाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघाला नाही. वारणेचे पाणी इचलकरंजीकरांना देणार नाही, यानिमित्ताने ...

संदीप बावचे।लोकमत न्यूज नेटवर्कगेल्या अनेक वर्षांपासून नदीक्षेत्रात वाढलेले औद्योगीकरण, शहरातील सांडपाणी यामुळे वरदान ठरलेली पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी शाप ठरली आहे. नदी प्रदूषणावर प्रत्येक वर्षी आंदोलने होत असतात, जनहित याचिका दाखल झाली आहे. मात्र, लोकांच्या जिवावर उठलेले पाणी प्रदूषणाच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघाला नाही. वारणेचे पाणी इचलकरंजीकरांना देणार नाही, यानिमित्ताने पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता तरी पंचगंगा प्रदूषणमुक्त होणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.पंचगंगा नदीमुळे शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, शिरढोण, तेरवाड, कुरुंदवाड, शिरोळसह सुमारे तेवीस गावे ओलिताखाली आली. त्यामुळे शेती हिरवाईने नटली. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र, बारमाही वाहणाऱ्या या नदीमुळे काठावरील गावांत औद्योगिक क्षेत्र वाढले अन् कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत औद्योगीकरणाचे, शहरातील सांडपाण्याचे पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत गेला. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे नदीपात्रातील पाणी स्वच्छ करणारे नैसर्गिक जलचर प्राणी नाश पावत असल्याने पाणी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. जलपर्णीने पंचगंगा नदी व्यापून गेली, असे चित्र दिसत आहे.वाहून येणारे प्रदूषित पाणी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ व तेरवाड या शेवटच्या बंधाºयावर येऊन तटत असल्याने याचा फटका या तालुक्यालाच बसत आहे. प्रदूषित पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम तर होत आहेच, शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पिकाऊ जमीन नापीक बनत आहे. त्यामुळे शेतकरीही नापीक शेतीमुळे बेकार बनत आहेत. वारणा बचावच्या निमित्ताने पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी प्रत्येक गावात सांडपाणी प्रकल्प उभारण्याची गरज आहे.वारणेसाठी नागरिकांची वज्रमूठइचलकरंजीच्या अमृत योजनेला वारणेतून एक थेंबही पाणी देणार नाही यासाठी दानोळीसह वारणाकाठच्या गावांनी लढा सुरू केला आहे. गेल्या चौदा महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने वारणाकाठच्या शेतकºयांनी जनजागृती सुरू केली आहे. इचलकरंजी पालिकेने पोलीस बळाचा वापर करून दानोळी येथे वारणा योजनेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकीच्या बळावर दानोळीकरांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वारणेच्या पाण्यावरून मोठा संघर्ष सुरू झाला आहे. शिरोळ तालुक्यासह वारणाकाठाकडून आंदोलनासाठी वज्रमूठ बांधली जात आहे.नदी प्रदूषणाचे विषरसायनयुक्त दूषित पाणी थेट पंचगंगेबरोबर कृष्णा नदीत मिसळत असल्याने दरवर्षी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. सांगलीकडून येणाºया दूषित पाण्याचा फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे. कॅन्सरसारख्या भयावह रोगाने तालुक्याला ग्रासले आहे. त्यामुळे शासनाने नदी प्रदूषणमुक्तीसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून होत आहे.दानोळीकरांचे इचलकरंजीला बळइचलकरंजी नगरपालिकेने पंचगंगेचे पाणी प्रदूषित झाले म्हणून मजरेवाडीतून कृष्णेची पाणी योजना राबविली, तर शहरासाठी तिसरी पाणी योजना म्हणून शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील वारणा नदीतून राबविली जाण्याचा घाट घातला जात आहे. मात्र, वारणा बचाव कृती समितीने वारणेतून योजना राबविण्यापेक्षा पंचगंगा प्रदूषणमुक्त करावी यासाठी वारणाकाठचे पाठबळ असेल, अशी भूमिका घेतली.