पाणीपट्टी थकबाकीदारांना दणका; एक लाख ८९ हजारांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 01:22 PM2019-11-28T13:22:48+5:302019-11-28T13:25:49+5:30

स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी थकीत वसुलीवरून महापालिकेच्या प्रशासनाला खडे बोल सुनावले.

The water bar beats the outstanding | पाणीपट्टी थकबाकीदारांना दणका; एक लाख ८९ हजारांची वसुली

पाणीपट्टी थकबाकीदारांना दणका; एक लाख ८९ हजारांची वसुली

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीबिलांची रक्कम त्वरित भरून कनेक्शन बंद करण्याचा कटू प्रसंग टाळावा

कोल्हापूर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने थकबाकी वसुलीचा धडाका लावला आहे. बुधवारी शहरातील थकबाकी असणारी २५ पाणी कनेक्शन तोडण्यात आली. दिवसभरातील कारवाईमधून एक लाख ८९ हजार १२० रुपयांची वसुली करण्यात आली.

स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी थकीत वसुलीवरून महापालिकेच्या प्रशासनाला खडे बोल सुनावले. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बुधवारी पाणीपुरवठा विभागाकडून केसापूर पेठ, जुना बुधवार, दिलबहार तालीम, उमा टॉकीज, जरगनगर, सुभाषनगर, सदर बाजार या परिसरांतील थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये जयसिंग कोंडिबा कांबळे, आणाप्पा गोपाळ हुंबरे, सदाशिव संतराम शिंदे, विलास मल्हारराव गायकवाड, जुबेदा मुहीद्दीन मुश्रीफ, याकूब आदब जमखाने, बाबूराव आप्पा कापसे, दत्तात्रय ज्ञानदेव शिंदे, जे. जे. काझी, दिलीप सदाशिव कुंडले, वैभव बोधे, मोहन जगदीश भालेराव, शामराव रामचंद्र ढोबळे, भाऊसाहेब नरसिंग सुर्वे, रामचंद्र यशवंत पोवार, आनंदीबाई पांडुरंग जाधव, सुलोचना दिलीप परमार, संभाजी रामचंद्र शिंदे, धनाजी कल्याणकर, विलास कृष्णा सुतार, वर्षा सुनील कुलकर्णी, भैरू भुजंगा जोगदंडे, सोनाबाई ज्ञानू पोवार, कृष्णात पांडुरंग जाधव यांचा समावेश आहे. या थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडण्यात आली. वसुली मोहीम येथून पुढेही सुरू राहणार असल्याने शहरातील सर्व थकबाकीदारांनी थकीत पाणीबिलांची रक्कम त्वरित भरून कनेक्शन बंद करण्याचा कटू प्रसंग टाळावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पथकप्रमुख पी. एस. माने, अमर बागल, के. टी. पाटील, मोहन जाधव, संजय पाटील, रणजित संकपाळ, उदय पाटील, मीटर रीडर प्रथमेश माजगावकर, संदीप कांबळे, रवी वडगावकर, आदिनाथ शेलार, बाजीराव कांबळे, बाजीराव शिंदे, विश्वास कांबळे उपस्थित होते.

  • वसुलीसाठी पथक -५
  • २० हजारांवरील थकबाकीदार - १० हजार
  • कारवाईचे स्वरूप -पाणी कनेक्शन तोडणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे.
     

Web Title: The water bar beats the outstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.