मध्यरात्रीची घटना : बेवारस व्यक्तीला अज्ञात वाहनाने बहिरेवाडीजवळ ठोकरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 12:35 PM2020-05-31T12:35:54+5:302020-05-31T12:37:14+5:30

सकाळी अज्ञात माणसाचा मृतदेह महादेव बापू भराडे यांच्या शेताशेजारी असणाऱ्या गटारी शेजारी मृतदेह पडलेला जा- ये करणाऱ्या प्रवाशांना दिसला . या घटनेची माहिती सरपंच अनिल चव्हाण , सुरेश खोत यांनी आजरा पोलिसांना दिली.

An unidentified person was hit by an unidentified vehicle near Bahirewadi:. Midnight incident. | मध्यरात्रीची घटना : बेवारस व्यक्तीला अज्ञात वाहनाने बहिरेवाडीजवळ ठोकरले

उत्तूर - बहिरेवाडी मार्गावर हॉटेल पंचरत्न जवळ घटनास्थळी पाहणी करताना आजरा पोलिस

googlenewsNext

उत्तूर. उत्तूर - बहिरेवाडी ता. आजरा. मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बेवारस इसमाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बहिरेवाडी .ता. आजरा. येथील . हॉटेल पंचरत्न जवळ घडली . हा अपघात मध्यरात्री घडल्याची शक्यता आहे.

सकाळी अज्ञात माणसाचा मृतदेह महादेव बापू भराडे यांच्या शेताशेजारी असणाऱ्या गटारी शेजारी मृतदेह पडलेला जा- ये करणाऱ्या प्रवाशांना दिसला . या घटनेची माहिती सरपंच अनिल चव्हाण , सुरेश खोत यांनी आजरा पोलिसांना दिली.

मध्यरात्री अवजड वाहन उत्तूर - येथून बहिरेवाडी च्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर इसमाच्या डोक्यास गंभीर मार बसून डावा पाया मोडला आहे. अंगावर लाल रंगाचे शर्ट व पॅन्ट आहे.

घटना स्थळाला आजरा पोलिस निरीक्षक बालाजी भांगे भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या

Web Title: An unidentified person was hit by an unidentified vehicle near Bahirewadi:. Midnight incident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.