दुचाकींची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 08:09 PM2020-10-27T20:09:55+5:302020-10-27T20:12:02+5:30

bike, Karnatak, kolhapur, belgaon, police बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील १२ दुचाकी चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना हुक्केरी पोलिसांनी आज (मंगळवारी) ताब्यात घेवून त्यांच्याकडून ६ लाख २४ हजार रूपये किंमतीच्या तब्बल १२ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी दाऊद खुदासाब सरकवास (रा. चिमुड, जमखंडी), महेश बसाप्पा मगदूम (रा. कल्लोळी, गोकाक) व शिवानंद महादेव चौगुले (मूळ गाव बेनवाड, सध्या रा. हुक्केरी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Two-wheeler theft gang in police custody | दुचाकींची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

हुक्केरी (जि. बेळगाव) येथे पोलिसांनी कारवाई करून दुचाकींची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून जप्त केलेल्या विविध कंपन्यांच्या दुचाकी गाड्या. यावेळी गुरूराज कल्याणशेट्टी, शिवानंद गुडगनटी यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकींची चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यातहुक्केरी पोलिसांची कारवाई : १२ दुचाकी जप्त

संकेश्वर :बेळगाव व बागलकोट जिल्ह्यातील १२ दुचाकी चोरी करणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना हुक्केरी पोलिसांनी आज (मंगळवारी) ताब्यात घेवून त्यांच्याकडून ६ लाख २४ हजार रूपये किंमतीच्या तब्बल १२ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी दाऊद खुदासाब सरकवास (रा. चिमुड, जमखंडी), महेश बसाप्पा मगदूम (रा. कल्लोळी, गोकाक) व शिवानंद महादेव चौगुले (मूळ गाव बेनवाड, सध्या रा. हुक्केरी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी, हुक्केरी येथे दुचाकींची तपासणी सुरू असताना पोलिसांना विना नंबर प्लेट व कागदपत्रे नसलेली दुचाकी मिळाल्याने त्यांनी दाऊद व महेशकडे तपासणी केली. यावेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरी केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता त्यांनी याप्रकरणीतील आणखी एक साथीदार शिवानंद यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

या तिघांनीही मिळून हुक्केरी, गोकाक व खणगावमधून प्रत्येकी तर बेळगाव, बनूर, जमखंडी, सावळगी व सिंद्धी कुरबेट्टी येथून प्रत्येकी १ अशा एकूण १२ दुचाकी त्यांनी आजपर्यंत लांबविल्या सांगितले. यामध्ये फॅशन प्रो, प्लॅटीना, हिरोहोंडा, पल्सर या कंपन्यांच्या गाड्या त्यांनी चोरल्या आहेत. चोरीची नोंद हुक्केरी पोलिसात झाली आहे.
पोलिस उपअधिक्षक गुरूराज कल्याणशेट्टी, पोलिस निरीक्षक शिानंद गुडनगटी यांनी ही कारवाई केली.

 

Web Title: Two-wheeler theft gang in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.