दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 10:40 PM2020-03-05T22:40:31+5:302020-03-05T22:47:04+5:30

२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत.

Two more television stations will be closed | दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे बंद होणार

दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे बंद होणार

Next
ठळक मुद्देखासगी चॅनेलचा प्रवेश इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचे चित्रच पालटले.

चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : रामायण, महाभारत मालिकेला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारी दूरदर्शनची आणखी १२५ प्रक्षेपण केंद्रे पाच एप्रिलपर्यंत बंद होणार आहेत. त्यामध्ये सांगली, पंढरपूरसह महाराष्टतील २१ केंद्रांचा समावेश आहे.

देशात दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर त्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी दूरचित्रवाणी संचाला काड्यांचा अ‍ॅन्टेना जोडावा लागत असे. डिजीटल युग येईपर्यंत घराघरांवर असा अ‍ॅन्टेना दिसत होता. सध्या अपवादात्मक कुठेतरी ते दिसतात. खासगी चॅनेलचा प्रवेश इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचे चित्रच पालटले. काड्यांच्या अ‍ॅन्टेनाची जागा डिश अ‍ॅन्टेना आणि केबलने घेतली. तंत्रज्ञान बदलले तसे दूरदर्शनच्या अ‍ॅनालॉग टेरेस्टेरीयल ट्रान्समिशन (स्थानिक प्रक्षेपण केंद्र)चे महत्त्व कमी होऊ लागल्याने, तसेच ही यंत्रणा कालबाह्य ठरू लागल्याने टप्प्याटप्प्याने ती बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अर्थात प्रसार भारतीने घेतला.

२०१८ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. देशात सुमारे १४०० अशी प्रक्षेपण केंद्रे आहेत. पहिल्या चार टप्प्यांत यातील ६०० केंद्रे बंद करण्यात आली आहेत. पाचव्या टप्प्यांत आणखी १२५ केंद्रे बंद होणार आहेत.


कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेणार
दूरदर्शनची प्रक्षेपण केंद्रे बंद होत असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेतले जाणार आहे; मात्र त्यासाठी बदली होईल त्या ठिकाणी जाणे भाग आहे. २० ते २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचाºयांना हे कठीण वाटत आहे. नव्या ठिकाणी आपले कसे जमायचे, या विचाराने ते अस्वस्थ आहेत.
ही केंद्रे होणार बंद : अकलूज, बदलापूर, चिखली, हिंगणघाट, खामगाव, खोपोली, किनवट, महाड, म्हासळे, मोर्शी, पंढरपूर, परभणी, पुसद, संगमनेर, सांगली, शहादा, शिर्डी, शिरपूर, तुमसर, उमरगा, उमरखेड.

Web Title: Two more television stations will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.