संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:53 PM2020-11-07T12:53:47+5:302020-11-07T12:57:42+5:30

accident, sankeswar, belgoan, karnataka, kolhapurnews संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. दुचाकी अपघातात शंकर राजू गायकवाड (वय २६, रा. अनंत विद्यानगर, गडहिंग्लज रोड, संकेश्वर) तर टेम्पो अपघातात सुरेश लक्ष्मण बनकर (वय ५३, रा. नंदीकुरळी, ता. रायबाग) यांचा मृतात समावेश आहे.

Two killed in two separate accidents near Sankeshwar | संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

googlenewsNext
ठळक मुद्देसंकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ठारअज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक

संकेश्वर : संकेश्वरनजीक दोन वेगवेगळ्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. दुचाकी अपघातात शंकर राजू गायकवाड (वय २६, रा. अनंत विद्यानगर, गडहिंग्लज रोड, संकेश्वर) तर टेम्पो अपघातात सुरेश लक्ष्मण बनकर (वय ५३, रा. नंदीकुरळी, ता. रायबाग) यांचा मृतात समावेश आहे.

अधिक माहिती अशी, कणकला (ता. हुक्केरी) हून संकेश्वरकडे टीव्हीएस दुचाकी क्रमांक केए २३, ईसी १७८९ वरून शंकर राजू गायकवाड येत असताना सोलापूर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, चिक्कोडीहून भरधाव वेगाने संकेश्वरकडे ४०७ मालवाहू टेम्पो क्रमांक केए २३, ९३१९ मधून गूळ घेवून बाजारास येताना बोरगल फाटा (ता. चिक्कोडी) लगत वाहनाचा ताबा सुटल्याने केसरहळीच्या शेताजवळ हनुमान मंदिर समोरील रस्त्यालगतच्या झाडास व विद्युतखांबास धडक दिल्याने टेम्पोचालक बनकर यांचा मृत्यू झाला.

Web Title: Two killed in two separate accidents near Sankeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.