दोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:25 PM2020-08-03T17:25:15+5:302020-08-03T17:26:33+5:30

किरकोळ कारणांवरुन दोन कुटुंबांत काठीने झालेल्या एकमेकांवरील हल्ल्यात सहाजण जखमी झाले. ही घटना फुलेवाडी बोंद्रेनगरात गगनगिरी पार्कमध्ये घडली. याबाबत दोन्हीही कुटुंबीयांनी एकमेकांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

Two families attack each other with sticks, incident in Bondrenagar | दोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना

दोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना

Next
ठळक मुद्देदोन कुटुंबाचा एकमेकांवर काठीने हल्ला, बोंद्रेनगरातील घटना सहा जखमी ; पोलिसांत परस्परविरोधी तक्रार

कोल्हापूर : किरकोळ कारणांवरुन दोन कुटुंबांत काठीने झालेल्या एकमेकांवरील हल्ल्यात सहाजण जखमी झाले. ही घटना फुलेवाडी बोंद्रेनगरात गगनगिरी पार्कमध्ये घडली. याबाबत दोन्हीही कुटुंबीयांनी एकमेकांविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

याबाबत राजू बाबू बरगे याने दिलेल्या तक्रारीनुसार, सिंधू गावडे हे कोणाला तरी शिव्या देत होते, त्यावेळी मंगल यांनी त्याबाबत त्यांना विचारले असता त्यावेळी चिडून सिंधू गावडे याने मंगलला शिवीगाळ केली. त्याबाबत राजू बरगे यांनी जाब विचारता गावडे व त्याचा भाचा सागर बोडके यांनी राजूसह त्यांचे वडील बाबू बरगे, पत्नी मंगलला काठीने मारहाण करून जखमी केले. याबाबत सिंधु गावडे, सागर बोडके (रा. बोंद्रेनगर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, सिंधु गावडे याने दिलेल्या तक्रारीवरून राजू बरगे व त्याचे वडील बाबू बरगे, बंडा बोडेकर, पांडूरंग बोडेकर (रा. गगनगिरी पार्क, बोंद्रेनगर) या चौघांनी १५ दिवसांपूर्वी नळाच्या पाण्यावरुन झालेल्या वादातून आपल्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान केले.

तसेच आपल्यासह पत्नी सुप्रिया, आत्याचा मुलगा सागर बोडके यांना काठीने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. याबाबत राजू बरगे, बाबू बरगे, बंडा बोडेकर, पांडुरंग बोडेकर यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
 

Web Title: Two families attack each other with sticks, incident in Bondrenagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.