शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सूर्यकिरणांचा ‘कटांजल’ स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:40 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई किरणोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत ठरलेल्या दिवसांनंतरही किरणोत्सव झाल्याने यंदा किरणोत्सवाच्या आदल्या दिवशी बुधवारपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व अभ्यासकांनी सूर्यकिरणांची पाहणी केली. किरणोत्सवानंतर रविवारी पाचव्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४४ ते ४६ मिनिटे या दोन मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीच्या ...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई किरणोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात झाली. मात्र, गेल्या काही वर्षांत ठरलेल्या दिवसांनंतरही किरणोत्सव झाल्याने यंदा किरणोत्सवाच्या आदल्या दिवशी बुधवारपासूनच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व अभ्यासकांनी सूर्यकिरणांची पाहणी केली. किरणोत्सवानंतर रविवारी पाचव्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ४४ ते ४६ मिनिटे या दोन मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीच्या पायाखाली असलेल्या कटांजलाला स्पर्श करून उजव्या बाजूंनी ती लुप्त झाली.श्री अंबाबाईचा दि. ९ ते ११ नोव्हेंबर व दि. ३१ जानेवारी १ व २ फेब्रुवारी असा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. पहिल्या दिवशी मावळतीची किरणे अंबाबाई मूर्तीचा चरणस्पर्श, दुसºया दिवशी कमरेपर्यंत व तिसºया दिवशी मूर्तीच्या चेहºयावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. मात्र, पूर्वीच्या काळी किरणोत्सव पाच दिवसांचाच असायचा नंतर तो तीन दिवसांवर आला. पुन्हा किरणोत्सव पाच दिवसांचा जाहीर केला जावा, अशी मागणी अभ्यासकांतून होत होती. त्यानुसार देवस्थान समिती व अभ्यासकांनी यंदा पाच दिवस किरणांची पाहणी सुरू केली तसेच सूर्यकिरणांच्या मार्गांचा आणि त्यात येणाºया अडथळ्यांचा अभ्यासही केला.रविवारी किरणोत्सवांच्या पाचव्या दिवशी तो अभ्यासण्यात आला. त्यामध्ये सायंकाळी सूर्यकिरणे अंबाबाईच्या पायाखालील कटांजलला स्पर्श करून ती उजव्या बाजंूनी लुप्त झाली. ताराबाई रोडवरील दोन इमारती अजूनही सूर्यकिरणांच्या मार्गावरील अडथळा ठरत असल्याचे अभ्यासकांना दिसून आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पोवार, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, शाहीर राजू राऊत, विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह अभ्यासक उपस्थित होते.

टॅग्स :Templeमंदिर