खुनी हल्लाप्रकरणी जयसिंगपूरच्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:17 AM2021-06-23T04:17:51+5:302021-06-23T04:17:51+5:30

शिरोळ : जयसिंगपूरच्या एकावर चाकू व दगडाने खुनी हल्ला केल्याप्रकरणी संदीप रामू भोसले (वय ३२), सुरज हनमंत चौगुले (वय ...

Three arrested in Jaisingpur in murder case | खुनी हल्लाप्रकरणी जयसिंगपूरच्या तिघांना अटक

खुनी हल्लाप्रकरणी जयसिंगपूरच्या तिघांना अटक

googlenewsNext

शिरोळ : जयसिंगपूरच्या एकावर चाकू व दगडाने खुनी हल्ला केल्याप्रकरणी संदीप रामू भोसले (वय ३२), सुरज हनमंत चौगुले (वय २१, दोघे रा. बावन्न झोपडपट्टी शाहूनगर जयसिंगपूर) व प्रवीण सुभाष कोळी (वय २२, रा. जैनापूर, ता. शिरोळ) या तिघांना शिरोळ पोलिसांनी अटक केली. तर हनमंत नागाप्पा गाडीवडर हा फरारी आहे. यामध्ये राजू हणमंता बनपट्टी (वय ४५, रा. बावन्न झोपडपट्टी, शाहूनगर, जयसिंगपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी, सोमवारी (दि.२१) दुपारी साडेअकराच्या सुमारास जयसिंगपूर-शिरोळ बायपास मार्गावर आगर फाटा कमानीजवळ मौजे आगर याठिकाणी संशयीतांनी तक्रारदार बनपट्टी याला अडवून गंभीर मारहाण केली होती. यावेळी त्याच्यावर दगड व चाकूने गंभीर वार करुन जखमी केले होते. तसेच त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन व दोन अंगठ्या घेवून संशयित फरार झाले होते. दरम्यान, शिरोळ पोलिसांनी तपासयंत्रणा गतिमान करून तिघा संशयितांना अटक केली आहे. तर एकजण फरारी आहे.

Web Title: Three arrested in Jaisingpur in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.