वडगाव पोलीस ठाण्यासमोर दारू पिऊन गोंधळ: तीन जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:26 AM2021-05-08T04:26:03+5:302021-05-08T04:26:03+5:30

या प्रकरणी विजय बाबासोा यलमारे (वय ३१), संभाजी मंगू माने (वय ४५), महम्मद शमशुद्दीन अथणीकर (वय ४०, सर्व ...

Three arrested for drinking in front of Wadgaon police station | वडगाव पोलीस ठाण्यासमोर दारू पिऊन गोंधळ: तीन जण अटकेत

वडगाव पोलीस ठाण्यासमोर दारू पिऊन गोंधळ: तीन जण अटकेत

Next

या प्रकरणी विजय बाबासोा यलमारे (वय ३१), संभाजी मंगू माने (वय ४५), महम्मद शमशुद्दीन अथणीकर (वय ४०, सर्व रा. पेठवडगाव) अशी गुन्हा नोंद करून अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद पोलीस नाईक प्रमोद चव्हाण यांनी दिली.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : वडगाव पोलीस ठाणा परिसरातून रिक्षा (एमएच ०९,बी.ए ०२६६) फिरवत दारूच्या नशेत आरडाओरड करत संशयित हे दुसऱ्या दरवाजातून निघून गेले. ही रिक्षा पोलीस ठाण्यासमोर चव्हाण, संदीप गायकवाड यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. पण, यास दाद न देता पलायन करण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा धाडसाने दोनशे फूट पाठलाग करत ही रिक्षा संजीवन मेडिकलसमोर थांबवली. यावेळी तिघांनी हुज्जत घालून धक्काबुक्की केली. पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणला.

दरम्यान, ही रिक्षा अडविताना चव्हाण यांना तळहाताला तर गायकवाड यांना पोटाला खरचटले, तर संशयित संभाजी माने यांना रिक्षाचा लोखंडी बार लागून कानाला दुखापत झाली. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी करीत आहेत.

Web Title: Three arrested for drinking in front of Wadgaon police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.