Three arrested for betting on a cricket match | क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळणारे तिघे अटक

क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळणारे तिघे अटक

कोल्हापूर : आयपीएल २०-२० क्रिकेट सामन्यावर बेटिंग जुगार खेळणाऱ्या तिघांना राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. पोलिसांनी सहाजणांवर गुन्हा नोंदविला. मंगळवारी रात्री राजारामपुरीतील शाहूनगर चौकात विकास परमिट रूमवर छापा टाकून कारवाई केली. छाप्यात रोकड, तीन किमती मोबाईलसह एकूण एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक केलेले संशयित : सुजित कांतीलाल ओसवाल (वय ४३, रा. काशीद कॉलनी, प्रतिभानगर), दिनेश लिलावचंद ओसवाल (४५, रा. स्टेट बॅंक बिल्डिंग, भगतसिंग कॉलनी, प्रतिभानगर), अजित रतनलाल ओसवाल (४९, रा. गंगावेश), तर बार व्यवस्थापक संदीप नलवडे, सौरभ कदम, एस. मोसिन (मुंबई) यांच्यावर बुधवारी सकाळी गुन्हे दाखल केले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूनगर चौकातील विकास परमिट रूम बीअर बारमध्ये ‘आयपीएल २०-२०’ क्रिकेट स्पर्धेतील मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल या संघांमध्ये सामन्यावर स्वत:च्या फायद्यासाठी बेटिंग जुगार सुरू असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकला. तेथे सुजित ओसवाल, दिनेश ओसवाल, अजित ओसवाल हे तिघे एलसीडी टी.व्ही.वर पाहून क्रिकेट सामन्यामधील संघावर फोनवर बोली लावून त्यावर पैसे लावून बेटिंग खेळत होते. छाप्यात रोख सात हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच तिघांना अटक केली.

बार बाहेरून बंद, आत सुरू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असताना विकास परमिट रूम बार बाहेरून बंद, तर आत बेटिंग जुगार खेळणारे दारू पीत व जेवन करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी खेळणाऱ्या तिघांसह बार व्यवस्थापक संदीप नलवडे, सौरभ कदम तसेच मुंबईत फोनवर बेटिंग घेणारे एस. मौसिन याच्यावर गुन्हे नोंदविले.

फोटो नं. २१०४२०२१-कोल-सुजित ओसवाल (आरोपी)

फोटो नं. २१०४२०२१-कोल-दिनेश ओसवाल (आरोपी)

फोटो नं. २१०४२०२१-कोल-अजित ओसवाल (आरोपी)

===Photopath===

210421\21kol_5_21042021_5.jpg~210421\21kol_6_21042021_5.jpg~210421\21kol_7_21042021_5.jpg

===Caption===

फोटो नं. २१०४२०२१-कोल-सुजीत ओसवाल (आरोपी)फोटो नं. २१०४२०२१-कोल-दिनेश ओसवाल (आरोपी)फोटो नं. २१०४२०२१-कोल-अजीत ओसवाल (आरोपी)~फोटो नं. २१०४२०२१-कोल-सुजीत ओसवाल (आरोपी)फोटो नं. २१०४२०२१-कोल-दिनेश ओसवाल (आरोपी)फोटो नं. २१०४२०२१-कोल-अजीत ओसवाल (आरोपी)~फोटो नं. २१०४२०२१-कोल-सुजीत ओसवाल (आरोपी)फोटो नं. २१०४२०२१-कोल-दिनेश ओसवाल (आरोपी)फोटो नं. २१०४२०२१-कोल-अजीत ओसवाल (आरोपी)

Web Title: Three arrested for betting on a cricket match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.