GokulMilk Kolhapur : घरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे : नविद मुश्रीफ यांचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 07:07 PM2021-05-08T19:07:35+5:302021-05-08T19:10:37+5:30

GokulMilk Kolhapur : गोकुळमध्ये येथून पुढे कोणतीही बडदास्त चालणार नसून, आतापासूनच संघाचे ओपल हॉटेलमधील खाते बंद करण्याची सूचना नवनिर्वाचित संचालक नविद मुश्रीफ यांनी केली. संचालकांच्या फार्महाऊस, घरात काम करून गोकुळचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासूनच कामावर यावे, अन्यथा पुढील महिन्याचा पगार मिळणार नाही, असा दमही त्यांनी दिला.

Those who get salary sitting at home should come to work, otherwise salary is closed: Navid Mushrif's blow | GokulMilk Kolhapur : घरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे : नविद मुश्रीफ यांचा झटका

गोकुळच्या नवनिर्वाचित संचालकांनी शनिवारी गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावरील संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (छाया- राज मकानदार)

Next
ठळक मुद्देघरात बसून पगार घेणाऱ्यांनी कामावर यावे, अन्यथा पगार बंद  :नविद मुश्रीफ यांचा पहिल्याच बैठकीत झटका

कोल्हापूर : गोकुळमध्ये येथून पुढे कोणतीही बडदास्त चालणार नसून, आतापासूनच संघाचे ओपल हॉटेलमधील खाते बंद करण्याची सूचना नवनिर्वाचित संचालक नविद मुश्रीफ यांनी केली. संचालकांच्या फार्महाऊस, घरात काम करून गोकुळचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आजपासूनच कामावर यावे, अन्यथा पुढील महिन्याचा पगार मिळणार नाही, असा दमही त्यांनी दिला.

गोकुळच्या नवनिर्वाचित १७ संचालकांचा शनिवारी कार्यालयीन प्रवेश झाला. सकाळी अकरा वाजता संघाच्या ताराबाई पार्क आवारातील हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्पावर गेले. तिथे संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यालयीन प्रवेश केला.

यावेळी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. तेथून संचालकांनी हलसिध्दनाथाचे दर्शन घेतले. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, नवीद मुश्रीफ, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब चौगले, एस. आर. पाटील, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, अंजना रेडेकर उपस्थित होते. विरोधी चार संचालक अनुपस्थित होते.

 

Web Title: Those who get salary sitting at home should come to work, otherwise salary is closed: Navid Mushrif's blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.