Maharashtra Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला तोंडी जाहीरनामाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 06:06 PM2019-10-09T18:06:48+5:302019-10-09T18:10:51+5:30

दुष्काळ मुक्त, बेरोजगार मुक्त, प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे आवाहन आदीत्य ठाकरे यांनी शिरोली येथील छ. संभाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले. सुरुवातीला आदीत्य ठाकरे यांचे स्वागत शिवसेनेचे  माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांनी केले.   

Thackeray made an oral announcement to the public | Maharashtra Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला तोंडी जाहीरनामाच

Maharashtra Vidhan Sabha 2019 : आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला तोंडी जाहीरनामाच

googlenewsNext
ठळक मुद्देआदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला तोंडी जाहीरनामाच शिरोली येथील जाहीर सभेत प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आवाहन

शिरोली  शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करून बळीराजाला कर्जमुक्त करायचे आहे. भुकेलेल्या लोकांना दहा रूपयात पोटभर जेवण द्यायच आहे, असा तोंडी जाहीरनामाच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी जनतेसमोर मांडला.

दुष्काळ मुक्त, बेरोजगार मुक्त, प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी शिरोली येथील छ. संभाजी महाराज चौकात आयोजित केलेल्या जाहीर सभेत केले. सुरुवातीला आदित्य ठाकरे यांचे स्वागत शिवसेनेचे  माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे यांनी केले.   

यावेळी ठाकरे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे त्यासाठी जनतेची मदत मला मदत हवी आहे. महाराष्ट्रात आज ही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. राज्यात मोठे उद्योग आणून तरूणांना रोजगार उपलब्ध करून द्यायच स्वप्न आहे. प्रदुषण मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. ज्या प्रमाणे मुंबईत मल्टी स्पेशालीटी रूग्णालये आहेत, तशीच रूग्णालये कोल्हापुरातही उभा करायची आहेत. या रूग्णालयात गोरगरीब जनतेला कमी पैशात उपचार घेता येईल.

आपला विजय झालेला आहे पण गाफील राहायचे नाही कागल ,गडहिंग्लज ला जाऊन आलो आहे. तेथे ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साडेपाच हजार किलोमीटर फिरून गेलो, सगळ्या मतदारसंघात जाऊन साडेपाच हजार किलोमीटर फिरून अभ्यास केला आहे. माझ्यावर महाराष्ट्राने विश्वास दाखवून जनतेने अडचणी समोर येऊन सांगितल्या आहेत.

ठाकरे म्हणाले, पूरपरिस्थिती ही शिवसेनेने चांगले काम केले आहे. विधानभवनावर भगवा फडकण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना  निवडून द्या असे आवाहन आदित्य  ठाकरे यांनी सभेत केले.यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांची भाषणे झाली.

Web Title: Thackeray made an oral announcement to the public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.