साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे-फडणवीस समोरासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 02:26 PM2021-07-30T14:26:14+5:302021-07-30T14:31:21+5:30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरमधील कुंभार गल्लीतील पूरस्थितीची पाहणी करत होते. एवढ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ताफा कुंभार गल्लीजवळ येतो. मिलिंद नार्वेकर पुढे येतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात आणि केवळ साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे फडणवीस समोरासमोर येतात.

Thackeray-Fadnavis face to face for three and a half minutes | साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे-फडणवीस समोरासमोर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ताफा कुंभार गल्लीजवळ येतो. मिलिंद नार्वेकर पुढे येतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात आणि केवळ साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे फडणवीस समोरासमोर येतात. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देसाडे तीन मिनिटांसाठी ठाकरे-फडणवीस समोरासमोरदोन्ही नेत्यांची ही भेट राज्यभर ठरली चर्चेची

कोल्हापूर  : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरमधील कुंभार गल्लीतील पूरस्थितीची पाहणी करत होते. एवढ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ताफा कुंभार गल्लीजवळ येतो. मिलिंद नार्वेकर पुढे येतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात आणि केवळ साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे फडणवीस समोरासमोर येतात.

  • शुक्रवार दि. ३० जुलै २०२१
  • स्थळ- कुंभार गल्ली कोल्हापूर
  • दुपारी सव्वा बाराची वेळ


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरमधील कुंभार गल्लीतील पूरस्थितीची पाहणी करत होते. एवढ्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ताफा कुंभार गल्लीजवळ येतो. मिलिंद नार्वेकर पुढे येतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात आणि केवळ साडे तीन मिनिटांसाठी ठाकरे फडणवीस समोरासमोर येतात.

सुरूवातीला नमस्कार.. मग चर्चा... मग कानगोष्टी आणि नंतर फडणवीस यांचे दिलखुलास हास्य. या सर्व प्रसंगांचे जवळून साक्षीदार होते नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, पालकमंत्री सतेज पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील. या दोन्ही नेत्यांची ही साडे तीन मिनिटांची भेट राज्यभर चर्चेची ठरली.
 

Web Title: Thackeray-Fadnavis face to face for three and a half minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.