तावडे हॉटेल ते टोलनाका २० मिनिटांचा थरार : पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 12:39 AM2020-01-30T00:39:51+5:302020-01-30T00:41:29+5:30

या ठिकाणी नंबर नसलेली कार येताच निरीक्षक सावंत यांच्यासह रणजित कांबळे व अन्य सहकाऱ्यांनी कारला पाठीमागून, तर पुढे लेनवर उभे असलेले पांडुरंग पाटील यांनी उजव्या व नामदेव यादव यांनी डाव्या बाजूने कव्हर केले. त्यांना पोलीस आहे, असे सांगून थांबण्याचा इशारा करताच समोरच्या पोलिसांच्या अंगावर कार घालत दुसºया लेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दुभाजकाला कार धडकून थांबली.

Tawade Hotel to Tolanaka 5 minutes trek | तावडे हॉटेल ते टोलनाका २० मिनिटांचा थरार : पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

तावडे हॉटेल ते टोलनाका २० मिनिटांचा थरार : पोलीस कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

Next
ठळक मुद्देटीमचा महासंचालकांच्या हस्ते होणार गौरव पालकमंत्री सतेज पाटील यांचा पुढाकार

कोल्हापूर : हुबळीहून कोल्हापूरच्या दिशेने पळून आलेल्या राजस्थानच्या तीन गँगस्टरना पकडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी तावडे हॉटेल ते किणी टोलनाका असा २0 मिनिटांचा थरारक पाठलाग केला. त्यानंतर किणी टोलनाक्यावर गँगस्टरने केलेल्या गोळीबाराची पर्वा न करता तिघा गँगस्टरच्या मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक किरण भोसले, प्रशांत निशाणदार, कॉन्स्टेबल नामदेव यादव, पांडुरंग पाटील आणि रणजित कांबळे या शिलेदारांनी जिवाची बाजी लावली. त्यांच्यासह या टीमचा पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या हस्ते मुंबईत ३ फेब्रुवारीला विशेष गौरव केला जाणार आहे.

पुणे-बंगलोर महामार्गावर मंगळवारी (दि. २८) रात्री ८.३0 च्या सुमारास तावडे हॉटेलसमोर दबा धरून बसलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पांढ-या रंगाची कार भरधाव पुण्याच्या दिशेने पास झाली. पथकाने या कारचा पाठलाग सुरू केला. निरीक्षक सावंत यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण भोसले, प्रशांत निशाणदार, रमेश ठाणेकर, समीर मुल्ला, मच्छिंद्र पटेकर यांना किणी टोलनाका येथे नाकाबंदीच्या सूचना दिल्या. पोलीस कर्मचारी सुनील इंगवले,नामदेव यादव, रणजित कांबळे, पांडुरंग पाटील, सुरेश पाटील, चंदू नणवरे, सुजय दावणे, नितीन चोथे, वैभव पाटील, सुभाष वरुटे, संतोष माने, रवींद्र कांबळे, अमर वासुदेव, सहायक निरीक्षक संतोष पवार व सत्यराज घुले, आदी किणी टोलनाका येथे रात्री नऊच्या सुमारास आले.

या ठिकाणी नंबर नसलेली कार येताच निरीक्षक सावंत यांच्यासह रणजित कांबळे व अन्य सहकाऱ्यांनी कारला पाठीमागून, तर पुढे लेनवर उभे असलेले पांडुरंग पाटील यांनी उजव्या व नामदेव यादव यांनी डाव्या बाजूने कव्हर केले. त्यांना पोलीस आहे, असे सांगून थांबण्याचा इशारा करताच समोरच्या पोलिसांच्या अंगावर कार घालत दुसºया लेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दुभाजकाला कार धडकून थांबली.

कारमध्ये बसलेल्या पाठीमागील गुन्हेगाराने ‘उन्हके उपर फायर करो’ असे म्हणताच कारचालकाच्या शेजारी बसलेल्या शामलालने हवालदार नामदेव यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यांनी खाली वाकून कारचा दरवाजा बाहेरून दाबून धरत पाठीमागे आले. यावेळी शामलालने नामदेवला कव्हर करणाºया निरीक्षक सावंत यांच्या दिशेने गोळी झाडली. सावंत यांनी सर्व्हिस पिस्टलमधील आरोपीच्या दिशेने फायरिंग केले. यावेळी शामलाल आणि श्रवणकुमार पायावर गोळी लागल्याने जमिनीवर कोसळले. त्यानंतर तिघेही पोलिसांना शरण आले. हा थरार १0 मिनिटे सुरू होता.

  • गुंडांशी दोन हात करणा-या पोलिसांचा उद्या सत्कार


कोल्हापूर : किणी (ता. हातकणंगले) येथील टोलनाक्यावर धाडसाने व प्राणाची बाजी लावून राजस्थान येथील गुंडांशी दोन हात करणाºया कोल्हापूर दलातील दोन पोलीस कर्मचाºयांचा उद्या, शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
मंगळवारी रात्री किणी टोल नाक्यावर राजस्थान येथील कुख्यात बिष्णोई टोळीतील तीन गुंडांना जेरबंद केल्याबद्दल पोलीस कर्मचाºयांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या टीमने जिगरबाज कामगिरी करून कोल्हापूर पोलीस दलाची शान वाढविली. नामदेव यादव, पांडुरंग पाटील या पोलीस कर्मचाºयांनी दाखविलेली कर्तव्य तत्परता निश्चितच कौतुकास्पद असून, या टीमच्या कामगिरीबद्दल उद्या त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतरही सोशल मीडियावर या घटनेची छायाचित्रे शेयर करत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक सुरू होते.

आरोपी कुख्यात गुन्हेगार असल्याने ते पिस्तूल जवळ बाळगत असल्याची पूर्व कल्पना होती. किणी टोलनाक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करतेवेळी मोठ्या प्रमाणात असणारी प्रवाशांची, तसेच पथकातील पोलिसांची सुरक्षा लक्षात घेऊन सापळ्याचे नियोजन केले होते.
- तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक

Web Title: Tawade Hotel to Tolanaka 5 minutes trek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.