मैलामिश्रित सांडपाणी सोडणाऱ्यांना नोटीस काढा-- : आयुक्तांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 05:48 PM2020-03-14T17:48:59+5:302020-03-14T17:50:57+5:30

नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्यावरून सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोवार यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती.

Take notice of those who leave the muddy wastewater | मैलामिश्रित सांडपाणी सोडणाऱ्यांना नोटीस काढा-- : आयुक्तांचे आदेश

मैलामिश्रित सांडपाणी सोडणाऱ्यांना नोटीस काढा-- : आयुक्तांचे आदेश

Next

कोल्हापूर : पोलीस मुख्यालयाच्या मागील परिसरात मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडणाºया बिल्डरांना नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपशहर रचनाकार नारायण भोसले यांना दिले.

प्रभाग क्रमांक १३, रमणमळा येथील चार ते पाच बिल्डरांकडून मैलमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. १०० पेक्षा जास्त नळ टाकले जात असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्यावरून सामाजिक कार्यकर्ते सुरेश पोवार यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याची गंभीर दखल घेऊन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या संदर्भात खुलासा मागितला आहे.
 

Web Title: Take notice of those who leave the muddy wastewater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.