तांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 02:39 PM2020-06-02T14:39:09+5:302020-06-02T14:40:30+5:30

दारात गाडी घेवून उभा असताना पाठीमागून धडक दिल्याच्या कारणावरुन दोन शेजारी राहणाय्रा कुटूंबामध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये रागाच्या भरात दोघा जणांवर तलवार हल्ला करण्यात आला. ही घटना करवीर तालुक्यातील उपवडेपैकी तांबुळकरवाडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास घडली. दोन्ही कुटूंबांनी करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकमेंकांविरोधात फिर्याद दिली आहे.

Sword attack for minor reasons in Tambulwadi | तांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्ला

तांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देतांबुळवाडीत किरकोळ कारणावरुन तलवार हल्लादोन्हीकडून परस्पर तक्रारी

कोल्हापूर : दारात गाडी घेवून उभा असताना पाठीमागून धडक दिल्याच्या कारणावरुन दोन शेजारी राहणाय्रा कुटूंबामध्ये जोरदार वादावादी झाली. यामध्ये रागाच्या भरात दोघा जणांवर तलवार हल्ला करण्यात आला. ही घटना करवीर तालुक्यातील उपवडेपैकी तांबुळकरवाडी येथे सोमवारी रात्री १० च्या सुमारास घडली. दोन्ही कुटूंबांनी करवीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी एकमेंकांविरोधात फिर्याद दिली आहे.

करवीर पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तम संभाजी तांदुळकर (वय ३०) व आंबाजी तांदुळकर हे उपवडेपैकी तांदुळकरवाडी ) येथे एकमेंकांच्या शेजारी राहतात. रविवारी रात्री १० च्या सुमारास उत्तम शेजारी राहणाय्रा आंबाजी यांच्या दारात मोटरसायकल घेवून उभे होते.

आबाजी यांनी मोटरसायकलवरुन मागून येवून त्यांना जोराची धडक दिली. यवर उत्तम यांनी तुम्हाला दिसत नाही का असा जाब विचारला. यावर आंबाजी यांनी त्यांना शिवागाळ करण्यास सुरवात केली. याचवेळी संशयित राकेश तांबुळकर याने तेथे येवून उत्तम यांना लाथबुक्याने मारहाण करत डोक्यावर तलवार हल्ला केला.

याचवेळी उत्तम यांचे वडील संभाजी तांबुळकर यांंच्यावरही त्यांनी तलवार हल्ला केला. तसेच उत्तमचा भाऊ सचिन यालाही शिवीगाळ करुन मारहणा केली. या प्रकरणी राकेश तांबुळकर, आबाजी तांबुळकर, जयश्री तांबुळकर यांच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
 

Web Title: Sword attack for minor reasons in Tambulwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.