स्वाती कोरी यांना विधानपरिषदेवर घ्यावे, जनता दलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 07:02 PM2020-06-11T19:02:10+5:302020-06-12T14:52:46+5:30

जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आणि गडहिंग्लजच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रा. स्वाती महेश कोरी यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज (गुरूवारी) केली.

Swati Kori should be taken to the Legislative Council, demanded by Janata Dal | स्वाती कोरी यांना विधानपरिषदेवर घ्यावे, जनता दलाची मागणी

स्वाती कोरी यांना विधानपरिषदेवर घ्यावे, जनता दलाची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे स्वाती कोरी यांना विधानपरिषदेवर घ्यावे, जनता दलाची मागणी शरद पवार, मुश्रीफ यांना निवेदन

गडहिंग्लज : जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आणि गडहिंग्लजच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रा. स्वाती महेश कोरी यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज (गुरूवारी) केली.

मंत्री मुश्रीफ गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, गेली ५० वर्षे अ‍ॅड. शिंदे हे जातीवादी पक्षांच्या विरोधात लढत आहेत. पवार यांच्या विनंतीनुसार त्यांनी आपला हक्क सोडून बाबासाहेब कुपेकर यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. तसेच आजपर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुरोगामी विचारांच्या उमदेवारांच्या विजयासाठीच प्रयत्न केले आहेत.

अ‍ॅड. शिंदे यांच्याप्रमाणेच प्रा. कोरी यांनीही चंदगड व कागल मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष आणि मुश्रीफ यांना मनापासून पाठबळ दिले आहे. १५ वर्षातील गडहिंग्लज पालिकेतील कामगिरी विचारात घेवून प्रा. कोरी यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात, गडहिंग्लज शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, शशीकांत चोथे, बाळकृष्ण परीट, उदय कदम, रमेश मगदूम, महांतेश पाटील यांचा समावेश होता.

Web Title: Swati Kori should be taken to the Legislative Council, demanded by Janata Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.