करवीर तालुक्यात उभे ऊस पीके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:05 PM2019-11-27T15:05:30+5:302019-11-27T15:07:31+5:30

ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो

Sugarcane crop grown in Karvir taluka | करवीर तालुक्यात उभे ऊस पीके करपली

करवीर तालुक्यात उभे ऊस पीके करपली

googlenewsNext
ठळक मुद्देऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

सावरवाडी : तब्बल एक महिनाभर शेतीला पाणीपुरवठा झाला नसल्याने शेतीमध्ये भेंगा पडल्याने ऊस पीके वाळत आहेत . ग्रामीण भागातील सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरळीत सुरु झाल्या नाहीत .  शेतीच्या पाणीवाटपामध्ये नियोजनाचा अभाव आढळत आहे . शेतीस अपुरा पाणीपुरवठा होऊ लागल्याने करवीर तालुक्यात ऐन नोव्हेबर महिन्यात शेतीतील उभे ऊस पीके करपली आहेत . शेतकरी चिंतातुर बनाला आहे .
      ऊस पीकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पाण्याअभावी चांगलाच फटका बसतोय . ग्रामीण भागात शेती ओलीताखाली आणण्याचे शेती पाण्याचे नियोजन विस्कटले आहे . पाण्याअभावी उभे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होऊ लागले आहे . ग्रामीण भागात शेती पाणीपट्टीचे प्रचंड स्वरूपात दरवाढ झाली पण शेतीला अपुरापाण्याचा पुरवठा होतो .

 सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या पाणीवाटपात  अकार्यक्षमतेमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे .. विलंबाने सहकारी पाणी पुरवठा संस्था सुरु झाल्याने शेतीला भेगा पडल्याने पाण्याचे फेर वेळेवर पूर्ण होत नाहीत  भोगावती तुळशी नद्याच्या पात्रात पाणी असुनही शेतीला पाणी मिळत नाही .परिणामी अडसाली ऊस .भात क्षेत्रातील लागणी करणे यांना पाणी मिळत नाही .परिणामी लागणीचा हंगाम लांबल्याने याला जबाबदार कोण?हा प्रश्न शेतकऱ्यांच्यासमोर उभा आहे .ऊस  गळीत हंगामाच्या प्रारंभीच पाण्याअभावी करवीर तालुक्यात ऊस पिकांना चांगलाच फटका बसु लागल्याने ऊस वजनात कमालीचा आर्थिक तोटा शेतकऱ्यांना बसणार आहे . 

  •  तालुक्यातील कसबा बीड, महें, कोगे, गणेशवाडी, सावरवाडी, बहिरेश्वर, आदिभागात उभे ऊसपीकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ लागले आहे . पाणीपट्टीचे दर वाढले असुन त्यानुसार शेतीला पाणी मिळत नाही याचा परिणाम शेतीच्या अर्थव्यवस्थेवर बसत आहे . शेतकऱ्यांचे शेतीच्या व्यवसायात नुकसान संभवते . शेतीच्या पाण्यासाठी लढा उभारण्याचा सुर शेतकरी वर्गातुन उमटू लागला आहे


या वर्षी महापुर, अतिवृष्टी,परतीचा पाऊस, ऊस पाणीटंचाई याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे . पाणीपुरवठा संस्थांनी शेतीची पाणीपट्टीचे दर, कमी करावे . अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .= वाळलेल्या ऊसाला नुकसान भरपाई हवी !

  • नोव्हेंबर महिन्यात वाळलेल्या ऊसाचा शेतकऱ्यांनी पंचनामे करून ऊस पिकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे .


 

तीव्र आंदोलन छेडणार !
ऊस पिकांना पाणी न मिळास शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून शेतकरी मेळावा घेऊन निबंधक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार  !
दिनकर सुर्यवंशी,
( महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्य कौन्सील सदस्य )

Web Title: Sugarcane crop grown in Karvir taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.