कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 07:08 PM2021-11-26T19:08:43+5:302021-11-26T19:19:47+5:30

कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला. प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने कर्मचारी संप मागे घेत असल्याची माहिती एसटी कर्मचारी उत्तम पाटील यांनी दिली.

Strike of ST workers in Kolhapur postponed | कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, पण...

कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित, पण...

Next

कोल्हापूर : एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसाहून अधिक दिवस संप करत असलेल्या कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला. प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने कर्मचारी संप मागे घेत असल्याची माहिती एसटी कर्मचारी उत्तम पाटील यांनी दिली.

यावेळी, कोल्हापूर आगारातील ५८ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई रद्द केल्याचे पत्र व्यवस्थापक रोहन पलंगे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिले. त्यांनी ही सेवा पूर्ववत सुरू करून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले.

दरम्यान आज सकाळपासून कोल्हापूर आगारातून एसटीच्या एकूण २० फेऱ्या झाल्या. सकाळी साडे नऊच्या सुमारास कोल्हापूर ते इचलकरंजी अशी पहिली एसटी धावली.

आज झालेल्या एसटीच्या फेऱ्या

इचलकरंजी आगार मार्ग - इचलकरंजी ते कोल्हापूर  ०२ फेऱ्या
कागल आगार मार्ग - कागल ते पुणे  ०२ फेऱ्या
कोल्हापूर आगार मार्ग  - कोल्हापूर-स्वारगेट (खासगी शिवशाही)  ०२  फेऱ्या  
कोल्हापूर-सांगली -  १ फेरी .
कोल्हापूर -इचलकरंजी - १ फेरी
चंदगड आगार मार्ग - चंदगड - शिनोळी  ०४ फेऱ्या
चंदगड हलकर्णी  -  ०१ फेरी
हलकर्णी  शिनोळी  - ०१ फेरी
चंदगड- पाटणे फाटा   - ०१ फेरी
एकूण - २०  फेऱ्या

जोपर्यंत एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम होते. काल, मध्यवर्ती बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी तशी शपथ देखील घेतली. मात्र, सरकारने योग्य तोडगा काढल्याने मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन मागे घेत असल्याचे आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले. त्यानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांमध्ये काहीकाळ अस्वस्थता निर्माण झाली. यातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांनी आज, शुक्रवारपासून कामावर हजर राहावे, अन्यथा बडतर्फीच्या कारवाईस सामोरे जावे, असा इशारा दिला. यामुळे बडतर्फीच्या भितीपोटी काही कर्मचारी कामावर हजर देखील झाले होते. अखेर बऱ्यास दिवसानंतर पुन्हा लालपरीची चाके गतीमान होवू लागली. 

Web Title: Strike of ST workers in Kolhapur postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.