धमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावणे पडले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:00 PM2021-02-24T16:00:43+5:302021-02-24T16:04:15+5:30

Crime News Police Kolhapur- मारहाणीमुळे संतप्त झालेल्या युवकाने चिडून रागाच्या भरात धमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावला; पण मारहाण करणाऱ्यानेच त्याची तक्रार पोलिसांत दिली आणि स्टेटस लावणाऱ्या युवकास गजाआड जावे लागले. गणेश श्रीपती पाटील (वय २८, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे. ही घटना राजेंद्रनगरात घडली.

The status of the threatening photo was expensive to get on the mobile | धमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावणे पडले महाग

धमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावणे पडले महाग

Next
ठळक मुद्देधमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावणे पडले महाग  राजेंद्रनगरातील प्रकार :युवक गजाआड

कोल्हापूर : मारहाणीमुळे संतप्त झालेल्या युवकाने चिडून रागाच्या भरात धमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावला; पण मारहाण करणाऱ्यानेच त्याची तक्रार पोलिसांत दिली आणि स्टेटस लावणाऱ्या युवकास गजाआड जावे लागले. गणेश श्रीपती पाटील (वय २८, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे. ही घटना राजेंद्रनगरात घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश पाटील या युवकास त्याच्या मित्राने किरकोळ कारणांवरून बेदम मारहाण केली, त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील याने रागाच्या भरातच मारहाण करणाऱ्याचा फोटो व त्यावर धमकी देणारे लाल रंगाचे चिन्ह करून तो आपल्या मोबाईलला स्टेटस लावला. त्यामुळे मित्राने तातडीने पोलीस ठाणे गाठले, पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाटील याला अटक केली.

Web Title: The status of the threatening photo was expensive to get on the mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.