एस.टी. कामगार संघटनेची आक्रोश आंदोलनाद्वारे साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 06:30 PM2020-11-09T18:30:00+5:302020-11-09T18:32:07+5:30

staetransport, kolhapurnews, morcha थकीत वेतनासह कोरोनामुळे मृत झालेल्या कामागरांना पन्नास लाखांची मदत त्वरित द्या यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या शिवाजी पार्कातील वटेश्वर मंदिरासमोरील कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन करण्यात आले.

S.T. The agitation of the trade union was called by the agitation | एस.टी. कामगार संघटनेची आक्रोश आंदोलनाद्वारे साद

 महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी वेतनासह प्रलंबित मागण्यांकरिता सोमवारी कोल्हापूर विभागातर्फे शिवाजी पार्कातील वटेश्वर मंदिरासमोर आक्रोश आंदोलन केले.

Next
ठळक मुद्देएस.टी. कामगार संघटनेची आक्रोश आंदोलनाद्वारे साद थकीत वेतनासह विमा कवच मदत त्वरित द्या

कोल्हापूर : थकीत वेतनासह कोरोनामुळे मृत झालेल्या कामागरांना पन्नास लाखांची मदत त्वरित द्या यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या शिवाजी पार्कातील वटेश्वर मंदिरासमोरील कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन करण्यात आले.

राज्यातील सर्व एस.टी.कामगारांना तीन महिन्यांपेक्षा अधिकचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. यासह कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना पन्नास लाखांची मदत मिळालेली नाही. सक्तीची अर्जित २० दिवसांची रजा रद्द केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार फरक रक्कम व शिल्लक रजेचा पगार २०१६ पासून मिळालेला नाही.तो मिळावा. मासिकसह वैद्यकीय बिले दोन वर्षे मिळालेली नाहीत. ती मिळावीत. याकरिता संघटनेच्या केंद्रीय आदेशानुसार राज्यभरात हे आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर विभागातही आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कोल्हापूरसह संभाजीनगर, कागल, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, कुरुंदवाड, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा, मलकापूर, इचलकरंजी,विभागीय कार्यशाळा, गोकुळ शिरगाव टायर प्लांट, आदी ठिकाणचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

 

Web Title: S.T. The agitation of the trade union was called by the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.