होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत विश्वराज चव्हाण याला रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 01:55 PM2021-06-10T13:55:43+5:302021-06-10T13:57:14+5:30

Edication Sector Kolhapur : मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत येथील न्यू होराईजन 'सीबीएसई स्कूल'चा विद्यार्थी विश्वराज संजय चव्हाण यांने रौप्यपदक पटकावले.या परीक्षेला राज्यभरातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी बसले होते.

Silver medal to Vishwaraj Chavan in Homi Baba Pediatric Exam | होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत विश्वराज चव्हाण याला रौप्यपदक

होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत विश्वराज चव्हाण याला रौप्यपदक

googlenewsNext
ठळक मुद्देहोमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत विश्वराज चव्हाण याला रौप्यपदक'कोविड 19' विषयावर सादर केला प्रकल्प

गडहिंग्लज : मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेत येथील न्यू होराईजन 'सीबीएसई स्कूल'चा विद्यार्थी विश्वराज संजय चव्हाण यांने रौप्यपदक पटकावले.या परीक्षेला राज्यभरातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी बसले होते.

शालेय वयातच विद्यार्थ्यांन विज्ञान विषयाचीआवड निर्माण व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते.ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक,कृती संशोधन प्रकल्प व विज्ञान विषयातील सामान्य ज्ञान व मुलाखत अशा चार टप्पातून घेतली जाते. विश्वराजने या परीक्षेत 'कोविड 19' या विषयावर प्रकल्प सादर केला होता.

त्याला मुख्याध्यापिका सुनिता पाटील यांचे प्रोत्साहन तर श्रीधर पाटील, अमोल माने, प्रदीप चिंधी यांचे मार्गदर्शन मिळाले. तो महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. आण्णासाहेब चव्हाण यांचा नातू तर विश्वस्त डॉ. संजय व सुरेखा चव्हाण यांचा मुलगा आहे.

Web Title: Silver medal to Vishwaraj Chavan in Homi Baba Pediatric Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.