शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवभक्त कोल्हापुरातून दिल्लीकडे रवाना दिल्लीत शिवजयंती सोहळा :स्थानकावर घुमला ‘जय भवानी-जय शिवाजी’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:41 IST

कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाºया शिवजयंती सोहळ्यास कोल्हापुरातून मंगळवारी सकाळी पहिली शिवभक्तांची तुकडी निजामुद्दीन एक्स्प्रेस’ या रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली.

कोल्हापूर : दिल्ली येथे १९ फेब्रुवारीला होणाºया शिवजयंती सोहळ्यास कोल्हापुरातून मंगळवारी सकाळी पहिली शिवभक्तांची तुकडी निजामुद्दीन एक्स्प्रेस’ या रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा जयघोषांनी कोल्हापुरातील छत्रपती शाहू रेल्वेस्थानकावर वातावरण शिवमय झाले होते. या शिवभक्तांसाठी रेल्वेतील स्वतंत्र डब्याचे नियोजन केले होते.

दिल्ली येथे सोमवारी (दि. १९) शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. राज्याभिषेक हा लोकोत्सव करण्यात यश मिळविल्यानंतर आता शिवजयंती ही ‘राष्ट्रोत्सव’ व्हावा, या भूमिकेतून खासदार संभाजीराजे यांच्या पुढाकाराने हा शिवजयंती उत्सव दिल्लीतील राजपथशेजारी इंदिरा गांधी राष्टÑीय कला केंद्राच्या मैदानावर साजरा करण्यात येत आहे. यासाठी खासदार संभाजीराजे दिल्लीत थांबून नियोजनात व्यस्त आहेत. मंगळवारी सकाळीच अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य दिल्लीत पोहोचले आहेत. सोमवारी हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश असलेली शिवछत्रपतींची मिरवणूक लक्षवेधी ठरणार आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ९ वाजता शिवभक्तांची पहिली तुकडी दिल्लीकडे रेल्वेने रवाना झाली. हे शिवभक्त आज, बुधवारी सायंकाळी पोहोचणार आहेत.मिरजेतून आज शिवभक्त जाणारबुधवारी रात्री मिरज रेल्वे स्थानकातून गोवा एक्स्प्रेसने शिवभक्त रवाना होत आहेत. शिवाय शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मिरज रेल्वे स्थानकातून सुमारे ५०० हून अधिक शिवभक्त दिल्लीकडे रवाना होणार आहेत.शोभायात्रेत लवाजमा : दिल्लीमध्ये सोमवारी काढण्यात येणाºया शोभायात्रेत पुण्याचे ३०० कलाकारांचे स्वराज्य ढोलपथक, ६० कलाकारांचे ध्वजपथक, १२ कलाकारांचे तुतारी पथक, २०० जणांची वारकरी दिंडी, ७० कलाकारांचे लेझीम पथक, १२ जणांचे हलगी पथक, २० जणांचे शाहिरी पथक, ८० कलाकारांचे मर्दानी खेळ, २५ जणांचे मल्लखांब पथक, ५० जणांचे धनगरी ढोलपथक तसेच पूर्वोत्तर राज्यांतील लोककलाकार त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. शाहीर आझाद नायकवडी प्रथमच शिवाजी महाराजांचा हिंदीतून पोवाडा यावेळी सादर करणार आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज