हाथरसमधील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 05:52 PM2020-10-06T17:52:32+5:302020-10-06T17:54:42+5:30

Hathras Gangrape, kolhapurnews, shiv sena, upgovrment कोल्हापूर शहर शिवसेनेने मंगळवारी दुपारी शिवाजी चौकात हाथरस घटनेतील नराधमांच्या पुतळ्याचे दहन करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. मंगळवारी

Shiv Sena burns statue of Naradhama in Hathras | हाथरसमधील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

 हाथरसमधील घटनेविरोधात शहर शिवसेनेने मंगळवारी कोल्हापुरात शिवाजी चौकात नराधमांच्या पुतळ्याचे दहन करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध नोंदविला.

Next
ठळक मुद्देहाथरसमधील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन शिवाजी चौकात उत्तर प्रदेश सरकारचा निषेध

कोल्हापूर : शहर शिवसेनेने मंगळवारी दुपारी शिवाजी चौकात हाथरस घटनेतील नराधमांच्या पुतळ्याचे दहन करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला.

मंगळवारी शहर शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात भाजपमध्ये बेटी जलाओ पार्टी झाली आहे. बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारे योगी सरकार तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी करीत धिक्काराच्या घोषणाही दिल्या.

यावेळी इंगवले म्हणाले, बलात्काराच्या आरोपींचा दरवेळी भाजपशी संबंध आला आहे; पण भाजपने या घटना आपल्या राजकीय शक्तीचा वापर करीत दाबून टाकलेल्या आहेत. भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात? आताही भाजपवाले हाथरस येथील बलात्काऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.

संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री खरोखरच साधू आहेत की साधुपणाचे ढोंग करणारे अंधभक्त? असा सवाल उपस्थित करीत उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. रविभाऊ चौगुले, दीपक गौड यांनीही मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात शिवसेनाकोल्हापूर शहर महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंगल साळोखे, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, रूपाली कवाळे, पूजा कामते, शाहीन काझी, सुनीता भोपळे, जयवंत हारुगले, धनाजी दळवी, रणजित जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, अमित चव्हाण सहभागी झाले.

 

Web Title: Shiv Sena burns statue of Naradhama in Hathras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.