शहीद चौगुले यांच्या कुटुंबीयांचे कुलगुरू शिंदे यांच्याकडून सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:49 AM2019-12-20T11:49:39+5:302019-12-20T11:50:28+5:30

उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी (दि. १८) भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा दिलासा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी दिला.

Shinde's condolences to the family members of Shaheed Chougule | शहीद चौगुले यांच्या कुटुंबीयांचे कुलगुरू शिंदे यांच्याकडून सांत्वन

उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

Next
ठळक मुद्देशहीद चौगुले यांच्या कुटुंबीयांचे कुलगुरू शिंदे यांच्याकडून सांत्वनशहीद स्फूर्ती केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य

कोल्हापूर : उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हुतात्मा जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी (दि. १८) भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कुटुंबीयांना सावरण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असा दिलासा कुलगुरू डॉ. शिंदे यांनी यावेळी दिला.

उंबरवाडी येथे जाऊन डॉ. देवानंद शिंदे यांनी शहीद चौगुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. वीरपिता गणपती चौगुले, माता वत्सला, वीरपत्नी श्रीमती यशोदा, भाऊ रजत यांच्यासह चौगुले कुटुंबीयांचे त्यांनी सांत्वन केले.

कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी मेजर संतोष महाडिक शहीद झाले, त्यावेळी शिवाजी विद्यापीठातर्फे सातारा येथे शहीद स्फूर्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रामार्फत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे साहाय्य करण्यात येते.

शहिदांच्या मुलांना शालेय शिक्षण अथवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्थानिक संस्थांशी संवाद साधून मोफत शिक्षण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात. कुटुंबीयांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

या कुटुंबीयांशी एन. सी. सी. तसेच अन्य विद्यार्थ्यांचा संवाद घडवून राष्ट्रप्रेम, मूल्यविचार आणि समर्पण भावना यांचा विकास करण्यासाठी प्रेरित केले जाते. याच धर्तीवर चौगुले कुटुंबीयांनाही केंद्रामार्फत दिलासा व सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाच्या शहीद स्फूर्ती केंद्राचे समन्वयक डॉ. आर. व्ही. शेजवळ होते.

 

 

Web Title: Shinde's condolences to the family members of Shaheed Chougule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.