दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध -जेष्ठ साहित्यकांना कर्नाटकातुन अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 07:10 PM2020-01-14T19:10:30+5:302020-01-14T19:13:06+5:30

या वेळी नदीच्या एका काठावर महाराष्ट्र पोलीस तर दुसर्या काठावर कर्नाटक पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात तैनात होते.

The senior writers were sent back to Karnataka with abusive behavior | दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध -जेष्ठ साहित्यकांना कर्नाटकातुन अपमानास्पद वागणूक

दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध -जेष्ठ साहित्यकांना कर्नाटकातुन अपमानास्पद वागणूक

Next
ठळक मुद्देकागल जवळील दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध विधिवत पद्धतीने घालण्यात आले.


कागल
(जहॉगीर शेख)
कर्नाटक शासनाकडुन मराठी भाषा आणि मराठी लोकांच्यावर दडपशाही करण्यात येत असुन सीमा भागात होत असलेली मराठी साहित्य संमेलनावरती बंदी घालुन जेष्ठ साहित्यकांना कर्नाटकातुन अपमानास्पद वागणूक देत परत पाठवीले आहे.

याच्या निषेधार्थ आज कोल्हापुर जिल्हा शिवसेनेच्या वतीने कर्नाटक महाराष्ट्र हद्दीत असलेल्या कागल जवळील दुधगंगा नदीकाठी कर्नाटक सरकारचे श्राद्ध विधिवत पद्धतीने घालण्यात आले. या वेळी नदीच्या एका काठावर महाराष्ट्र पोलीस तर दुसर्या काठावर कर्नाटक पोलीस बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात तैनात होते. जिल्हा प्रमुख विजयराव देवणे, तालुका प्रमुख अशोकराव पाटील, विद्या गिरी,राजेंद्र सांळोखे, शिवगोंडा पाटील, धनाजी नागराळे, वैभव आडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The senior writers were sent back to Karnataka with abusive behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.