भारतीय ज्युनिअर फुटबॉल संघात ‘विश्व’ची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 11:23 AM2019-08-27T11:23:20+5:302019-08-27T11:27:49+5:30

भारतीय ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या विश्व विजय शिंदेची निवड झाली. महाराष्ट्रातील एकमेव खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे.

The selection of 'World' in the Indian Junior Football Team | भारतीय ज्युनिअर फुटबॉल संघात ‘विश्व’ची निवड

भारतीय ज्युनिअर फुटबॉल संघात ‘विश्व’ची निवड

Next
ठळक मुद्देभारतीय ज्युनिअर फुटबॉल संघात ‘विश्व’ची निवडभारतीय संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू

कोल्हापूर : भारतीय ज्युनिअर मुलांच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या विश्व विजय शिंदेची निवड झाली. महाराष्ट्रातील एकमेव खेळाडूची भारतीय संघात निवड झाली आहे.

ओडिसा येथे आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्यावतीने भारतीय ज्युनिअर मुले फुटबॉल संघाची निवड चाचणीतून २२ खेळाडूंची निवड करण्यात आली. विश्व सदरच्या संघांमधून आंतरराष्ट्रीय सराव सामने खेळण्यासाठी व्हिएतनाम व मलेशियाला रवाना झाला.

विश्व हा भारताचे आॅलिम्पिक कुस्तीपटू कै. दिनकर शिंदे यांचा पणतू आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्राचा घरातूनच वारसा मिळालेला आहे. तो महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला क्रीडा प्रशिक्षक प्रदीप साळोखे यांचे मार्गदर्शन लाभले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या एआयएफएफ स्काऊटिंग घेण्यात आले होते. त्यामधून विश्वची ओडिसा येथील निवड चाचणी शिबिरासाठी निवड झाली होती.

यामधून भारतीय संघात त्याची निवड झाली. यापूर्वी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिकेत जाधव याचीही निवड के. एस. ए.ने घेतलेल्या एआयएफएफ स्काऊटिंगमधून झाली होती. त्याला कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन संस्थेचे पेट्रन इन चीफ शाहू महाराज, पेट्रन मेंबर खासदार संभाजीराजे, आॅन जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, फुटबॉल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांचे प्रोत्साहन लाभले.
 

 

Web Title: The selection of 'World' in the Indian Junior Football Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.