सावकर मादनाईकांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:35 PM2022-05-13T16:35:22+5:302022-05-13T17:29:55+5:30

महापुरात शेतकऱ्यांची फसवणूक केली, एफआरपीचे तुकडे करणाऱ्या आघाडी सरकारकडून आपल्याला कोणतेही पद नको.

Savkar Madnaik resigns as District Planning Committee member | सावकर मादनाईकांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा

सावकर मादनाईकांचा जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा

googlenewsNext

उदगाव : जिल्हा परिषदेचे माजी सभापती, 'स्वाभिमानी'चे नेते सावकर मादनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे त्यांनी आज, शुक्रवारी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सुपुर्द केला. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके उपस्थित होते. काल, गुरुवारी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मादनाईक यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. 

पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे निवडीबाबत यादी पाठवली होती. त्यावरती काल, गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. स्वाभिमानी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडली. त्यामुळे नियोजन समितीचे पद नको असल्याचे पत्र यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र तरीही यांची नियुक्तीची घोषणा झाल्याने त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारकडून कोणतेही पद नको

आपण महाविकास आघाडी मधुन बाहेर पडलो आहोत. महापुरात शेतकऱ्यांची फसवणूक केली, एफआरपीचे तुकडे करणाऱ्या आघाडी सरकारकडून आपल्याला कोणतेही पद नको. महाविकास आघाडी सर्व निर्णय शेतकरी विरोधी घेत असल्यामुळे या पदाचा राजीनामा देत असल्याचे सावकर मादनाईक यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीवर २० जणांना संधी

जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यपदी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे यांच्यासह २० जणांची निवड करण्यात आली आहे.

नव्याने निवड झालेले सदस्य असे : नामनिर्देशित सदस्य : आमदार आबिटकर, आमदार पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, एम. एस. देशमुख (कोल्हापूर), संभाजी पवार (रा. लाटवडे, ता. हातकणंगले), शिवसेनेचे बाजीराव पाटील (रा. शिये, ता. करवीर).

विशेष निमंत्रित सदस्य असे : राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे (रा. बालिंगे, ता. करवीर), जयसिंग पाटील (रा. सुळंबी, ता. राधानगरी), माजी उपमहापौर संजय मोहिते ( कोल्हापूर), भगवान जाधव (रुकडी, ता. हातकणंगले), भारत पाटील (भुये, ता. करवीर), प्रेमला पाटील (कोरोची, ता. हातकणंगले), सर्जेराव शिंदे (दानोळी, ता. शिरोळ), माजी आमदार संपतराव पवार- पाटील यांचा मुलगा क्रांतिसिंह पवार- पाटील (सडोली खालसा, ता. करवीर), माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे (कोल्हापूर),  सचिन ऊर्फ युवराज पाटील (गडमुडशिंगी, ता. करवीर), मोहन धुंदरे ( राशिवडे, ता. राधानगरी), तानाजी आंग्रे (वरणगे, ता. करवीर), पोपट दांगट.

Web Title: Savkar Madnaik resigns as District Planning Committee member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.