हिंमत असेल, तर थेट बोला, समरजीत घाटगे यांचे हसन मुश्रीफ यांना आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 06:53 PM2021-02-24T18:53:09+5:302021-02-24T18:55:51+5:30

Samarjit Singh Ghatge Bjp Kolhapur- राज्य शासनाने गेल्या सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफ आदी शासनाने दिलेले शब्द पाळल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून, प्रसंगी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी दिला. माझ्यावर आडून पत्रकबाजी करण्यापेक्षा हिंमत असेल, तर थेट बोलण्याचे धाडस दाखवावे, असे उघड आव्हान त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

Samarjit Ghatge's challenge to Hasan Mushrif | हिंमत असेल, तर थेट बोला, समरजीत घाटगे यांचे हसन मुश्रीफ यांना आव्हान

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी बुधवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळ्यासमोर उपोषण केले. यावेळी अमल महाडिक, राहुल देसाई, धनंजय महाडिक, बाबासाहेब पाटील, आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला. (छाया : नसीर अत्तार)

Next
ठळक मुद्देहिंमत असेल, तर थेट बोला, समरजीत घाटगे यांचे हसन मुश्रीफ यांना आव्हान शेतकऱ्यांना दिलेले शब्द शासनाला पाळावेच लागतील

कोल्हापूर : राज्य शासनाने गेल्या सव्वा वर्षात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वीज बिल माफ आदी शासनाने दिलेले शब्द पाळल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसून, प्रसंगी सरकारला गुडघे टेकायला लावू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी दिला. माझ्यावर आडून पत्रकबाजी करण्यापेक्षा हिंमत असेल, तर थेट बोलण्याचे धाडस दाखवावे, असे उघड आव्हान त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले.

राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिले माफ करू, दोन लाखांवरील शेतकऱ्यांची कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी समरजीत घाटगे यांनी बुधवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून उपोषण केले.

घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण शिवार यात्रा काढली. त्यांच्या वेदना खूप आहेत, राज्य शासनाने सव्वा वर्षाच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वच घटकांची फसवणूक केली आहे. शासनाला दिलेल्या शब्दांचा विसर पडला आहे, त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत आहे. राजघराण्याबद्दल सातत्याने उल्लेख होतो, आपण राजघराण्यातील नव्हे तर महाराष्ट्राचा सेवक म्हणून उपोषणास बसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिवसभरात नवोदिता घाटगे, वीरेंद्रराजे घाटगे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार संपतराव पवार, अमल महाडिक, बाबासाहेब पाटील, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी भेट देऊन आंदोलनात सहभागी झाले. सायंकाळी सव्वासहा वाजता समरजीत घाटगे यांनी उपोषण सोडले.

 

Web Title: Samarjit Ghatge's challenge to Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.