रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:01 PM2020-08-03T17:01:33+5:302020-08-03T17:08:27+5:30

रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

Rotary, Kridai should set up system for Kovid in rural areas also, request of Guardian Minister Patil | रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती

रोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंती

Next
ठळक मुद्देरोटरी, क्रिडाईने ग्रामीण भागातही कोविडसाठी यंत्रणा उभारावी, पालकमंत्री पाटील यांची विनंतीमहासैनिक दरबार हॉल येथे कोविड केंद्राचे उद्घाटन

कोल्हापूर : रोटरी आणि क्रिडाई या दोन्ही संस्थांनी एका हाकेवर नेहमीच मदतीसाठी पुढे येत अभिमानास्पद काम केले आहे. आता शहराच्या धर्तीवर ग्रामीण भागात कोविड केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे विनंतीवजा आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

रोटरी मूव्हमेंट, क्रिडाईने जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून महासैनिक दरबार हॉलमध्ये उभ्या केलेल्या कोविड-१९ केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी झाले.

यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रिडाईचे राज्याचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिव ऋषिकेश केसकर, रोटरी मूव्हमेंटचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुधिहाळकर उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, क्रिडाई आणि रोटरी या दोन्ही संस्थांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्हेंटीलेटर आणि बेड देण्याचे आवाहन केले होते. एकूण ५३८ बेडचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी महासैनिक दरबार येथे १२५ बेडची सुविधा देण्यात आली आहे.

येत्या काळात या दोन्ही संस्थांनी नियोजन करून ग्रामीण भागात कायमस्वरूपी सुविधा उभी करावी असेही ते म्हणाले. यावेळी ह्यरोटरीह्णचे माजी प्रांतपाल प्रताप पुराणिक, प्रकाश जगदाळे, एस. एस. पाटील, उत्कर्षा पाटील, एम. वाय. पाटील, मेघना शेळके, योगिनी कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

रोटरीने अँटिजेन टेस्टिंग केंद्र उभे करावे

पल्स पोलिओचे मोहीम रोटरीने हाती घेऊन पोलिओमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. आता रोटरीला अँटिजेन टेस्टिंग किट पुरविले जातील. त्यांनी अँटिजेन टेस्टिंग केंद्र उभे करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

रोटरीच्या १२ क्लबनी एकत्र येऊन ६२ लाख रुपयांच्या माध्यमातून ५३८ बेडची सुविधा निर्माण केली आहे. आयसोलेशन रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालय येथेही स्वतंत्र रोटरी वॉर्ड करण्यात येणार आहेत, असे रोटरीचे संग्राम पाटील यांनी सांगितले. क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी १२५ बेडची सुविधा केली असून त्यासाठी ऑक्सिजनची सुविधाही देण्यात येईल असे सांगितले.
 

Web Title: Rotary, Kridai should set up system for Kovid in rural areas also, request of Guardian Minister Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.