खरेदीसाठी रस्ते, दुकाने, मॉल फुल्ल : गर्दीमुळे नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 07:23 PM2021-04-14T19:23:14+5:302021-04-14T19:25:55+5:30

CoronaVirus Kolhapur : पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, मॉल मध्ये बुधवारी दिवसभर खरेदीसाठी जनसागर लोटला. लोकांनी अक्षरश: रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. तर मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चक्क तासभरांची प्रतिक्षा करावी लागली.

Roads for shopping, shops, malls full: Crowds trample rules | खरेदीसाठी रस्ते, दुकाने, मॉल फुल्ल : गर्दीमुळे नियमांची पायमल्ली

कोल्हापुरातील संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरीकांची प्रचंड गर्दी उसळली होती. छत्रपती शिवाजी मार्केट येथील दुकानातून खरेदीकरीता नागरीकांचा रांगा लागल्या होत्या. छाया : नसीर अत्तार

googlenewsNext
ठळक मुद्देखरेदीसाठी रस्ते, दुकाने, मॉल फुल्ल : गर्दीमुळे नियमांची पायमल्ली संचारबंदीचा परिणाम : रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी

कोल्हापूर : पंधरा दिवस राज्यात संचारबंदी राहणार असल्याने शहराच्या विविध बाजारपेठा, भाजी मंडई तसेच दुकाने, मॉल मध्ये बुधवारी दिवसभर खरेदीसाठी जनसागर लोटला. लोकांनी अक्षरश: रांगा लावून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. तर मॉलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चक्क तासभरांची प्रतिक्षा करावी लागली.

राज्यात आगामी पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून सुरु झाली. गतवर्षी सलग दोन महिने झालेल्या संचारबंदीचा अनुभव असल्यामुळे यावेळी गैरसोय होऊ नये म्हणून पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला, कडधान्ये खरेदी करुन ठेवण्याचा आटापिटा केला. मंगळवारी रात्री संचारबंदीची घोषणा झाली, त्यामुळे बुधवारचा दिवस उजाडताच शहरातील बाजारपेठेत सकाळी नऊ वाजल्यापासून गर्दी व्हायला लागली.

धान्य बाजार, मिरची बाजार, शिवाजी मार्केटमधील दुकानगाळे, शहरातील सर्वच भाजी मंडई गर्दीने फुलून गेल्या. पुढील पंधरा दिवस घरात बसून करता येणाऱ्या कामांच्या अनुषंगानेही खरेदी झाली. काहींनी लग्नांच्या निमित्ताने खरेदी केली. प्रामुख्याने जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याकडे अधिक कल होता. विविध प्रकारच्या बिस्कीटापासून ते विविध प्रकारचे बेकरी खाद्य, अंडी खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.

महाद्वाररोड, ताराबाईरोड, कपिलतिर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी पाच बंगला या परिसरात मोठी गर्दी उसळली होती. शहराच्या विविध भागातील रस्त्यावर विक्रेत्यांनी मांडलेल्या फळ बाजारातही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली. उपनगरातील भाजी मंडईतूनही नागरीकांची गर्दी उसळल्याचे चित्र पहायला मिळाले. काही मोठ्या दुकानातून तसेच मॉलमध्ये लोकांनी रांगा लावून खरेदी केली. रंकाळा व ताराबाई पार्क येथील मॉलमध्ये तर प्रवेश मिळविण्यासाठी एक एक तास प्रतिक्षा करावी लागत होती.

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेत मोडणारे पेट्रोल पंप सुरु राहणार आहेत. परंतु आपणाला बाहेर पडायची अडचण झाली तर वाहनात पेट्रोल असलेले बरे म्हणून अनेकांना पेट्रोलची खरेदीही केली. काही पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या.
 

Web Title: Roads for shopping, shops, malls full: Crowds trample rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.