शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याची होणार डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:49 IST

कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा व गगनबावडा ते तळेरे या मार्गाच्या डागडुजीस लवकरच सुरुवात होणार आहे. राष्टÑीय महामार्ग विभागाने सात कोटींची निविदा प्रसिद्ध केली असून सहा महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे.कोल्हापूर ते गगनबावडा हा मार्ग तळकोकणाला जोडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाºया इतर मार्गापेक्षा जवळचा व सुरक्षित मार्ग म्हणून तळकोकणातील ...

कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा व गगनबावडा ते तळेरे या मार्गाच्या डागडुजीस लवकरच सुरुवात होणार आहे. राष्टÑीय महामार्ग विभागाने सात कोटींची निविदा प्रसिद्ध केली असून सहा महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे.कोल्हापूर ते गगनबावडा हा मार्ग तळकोकणाला जोडला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाºया इतर मार्गापेक्षा जवळचा व सुरक्षित मार्ग म्हणून तळकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा या मार्गांवरील वाहतूक अधिक असते. या मार्गांवरील वाहनांची संख्या पाहता रस्ता अरुंद आहे. रहदारी जास्त असल्याने रस्ता लवकरच खराब होतो. त्यात धुवाधार पाऊस असल्याने दरवर्षी रस्ता उखडला जातो. या मार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे बांधकाम विभागाकडून राष्टÑीय महामार्ग विभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला आहे. या राष्टÑीय मार्गाचे काम सुरू होण्यास अद्याप वेळ असून तोपर्यंत खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून डागडुजीच्या कामाची निविदा जाहीर केली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गासाठी ४ कोटी ३३ लाख ८८ हजार, तर गगनबावडा ते तळेरे रस्त्यासाठी २ कोटी ५६ लाख ६८ हजारांची निविदा राष्टÑीय महामार्ग विभागाने काढली आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर १६ फेबु्रवारीपर्यंत आॅनलाईन निविदा भरायची असून २० फेबु्रवारीला निविदा उघडण्यात येणार आहे. खड्डे भरण्यासह डांबरीकरणाचे काम यातून केले जाणार आहे.हस्तांतरणाचे भिजत घोंगडे!कोल्हापूर ते गगनबावडा मार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे; पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्टÑीय महामार्ग विभागाकडे अद्याप हस्तांतरित झालेला नाही. या रस्त्याचा विकास आराखडा राष्ट्रीय महामार्ग विभागाने तयार ठेवला आहे.दुसºयांदा निविदाया मार्गाच्या डागडुजीसाठी राष्टÑीय महामार्ग विभागाने यापूर्वीही निविदा काढली होती; पण दोन्ही कामांसाठी प्रत्येकी एकच निविदा आल्याने फेरनिविदा काढण्यात आली आहे.