शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

कारखान्यांकडील साखर विक्रीवर निर्बंध फेबु्रवारीत १७%, मार्चमध्ये १४% साखर विकता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:57 IST

कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : साखरेचे घसरते दर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी आणखी एक सकारात्मक पाऊल उचलताना साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध आणले. यानुसार कारखान्यांना फेबु्रवारीमध्ये त्यांच्याकडील कमाल १७ टक्के, तर मार्चमध्ये कमाल १४ टक्केच साखर विकता येणार आहे. यामुळे साखरेची बाजारातील आवक कमी होऊन तिचे दर वाढण्यास मदत होईल, अशी सरकार आणि साखर कारखानदारांचीही अपेक्षा आहे.

साखरेचे घाऊक बाजारातील दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. उसाची एफआरपी देणेही कारखानदारांना अडचणीचे झाले आहे. साखरेचे दर वाढावेत यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी मागणी कारखानदारांची आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने साखरेवरील आयात कर दुप्पट केला आहे. राज्य सरकारचाही साखर कारखान्यांकडील २५ टक्के साखर विकत घेण्याचा विचार आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांत साखरेचे दर ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. कारखान्यांवर विक्री मर्यादा घातल्यामुळे हे दर प्रतिक्विंटल तीन हजारांच्या पुढेच राहतील, असा साखर उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.अशी ठरेल साठामर्यादासरकारच्या निर्णयानुसार १ जानेवारीला कारखान्याकडे असलेली शिल्लक साखर अधिक जानेवारी महिन्यात झालेले उत्पादन यातून जानेवारीत झालेली विक्री वजा जाता शिल्लक राहिलेल्या साखरेपैकी जास्तीत जास्त १७ टक्के साखर फेबु्रवारीत विकता येणार आहे. अशाच पद्धतीने मार्चमध्ये जास्तीत जास्त १४ टक्के साखर कारखान्यांना विकता येणार आहे. याचाच अर्थ फेबु्रवारीत ८३ टक्के आणि मार्चमध्ये ८६ टक्के साखर कारखान्यांना स्वत:कडे ठेवावी लागेल. 

साखर कारखान्यांकडील साखरेच्या विक्रीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे बाजारातील साखरेचा ओघ कमी होऊन, दर वाढीस मदत होऊ शकेल आणि कारखान्यांना त्याचा फायदा होईल.-विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ.

गेल्या आठ ते दहा दिवसांत साखरेचे प्रति क्विंटल दर १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे ते आणखी वाढतील आणि ते साखर कारखानदारीसाठी फायदेशीर ठरेल.-प्रफुल्ल विठ्ठलानी, अध्यक्ष, आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने