आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन करा, अन्यथा काम बंद पाडणार-श्रीपतराव शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 07:18 PM2020-12-05T19:18:52+5:302020-12-05T19:25:52+5:30

dam, kolhapurnews गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा, मगच कामास सुरुवात करा, असा इशारा माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी येथे दिला. पुर्नवसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवा, असे आवाहन शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन करताना केले.

Rehabilitate the victims of the Ambeohal project first and then start the work | आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन करा, अन्यथा काम बंद पाडणार-श्रीपतराव शिंदे 

आंबेओहळ प्रकल्प ता.आजरा. येथे प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना माजी आमदार श्रीपतराव शिंदे , बाळेश नाईक , शिवाजी गुरव , संतोंष बेलवाडे

Next
ठळक मुद्देआंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा मगच कामास सुरुवातमाजी आमदार श्रीपतराव शिंदे यांचा इशारा, काम बंद पाडणार

रवींद्र येसादे

उत्तूर :  गेली २१ वर्षे रेंगाळलेल्या आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे आधी पुर्नवसन करा, मगच कामास सुरुवात करा, असा इशारा माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी येथे दिला. पुर्नवसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम बंद ठेवा, असे आवाहन शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी अ‍ॅड. शिंदे म्हणाले , आंबेओहळ प्रकल्पग्रस्त न्यायासाठी रस्त्यावरची लढ़ाई करीत आहेत. धरणग्रस्तांच्या पुर्नवसनाची बैठक शासकीय अधिकारी यांच्यासमवेत घेण्याचे ठरले असताना प्रकल्पाचे काम सुरू करणे अयोग्य आहे. धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवा अन्यथा धरणग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

यावेळी संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव म्हणाले, २१ वर्ष पुर्नवसनासाठी लढूनही आजपर्यंत न्याय मिळाला नाही. अधिकारी हे धरणग्रस्तांसोबत बनवेगिरी करतात. पुन्हा पुन्हा नोटीसा काढून धरणग्रस्तांना वेठीस धरतात. आमचे प्रश्न सोडवा, मगच धरणाचे काम करा. अन्यथा आमचा जीव गेला तरी आता माघार नाही. काम सुरू केले तर काम बंद पाडणार.

यावेळी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, वडकशिवालेचे सरपंच संतोष बेलवाडे, सचिन पावले यांची भाषणे झाली. प्रकल्पाचे अधिकारी खट्टे, बारदेस्कर यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रकल्प स्थळी महादेव खाडे, नामदेव पोटे, बजरंग पुंडपळ, श्रीराम चौगुले,मधुकर पोटे यांचेसह कर्पेवाडी, होन्याळी, आर्दाळ गावातील धरणग्रस्त उपस्थित होते. 

धरणग्रस्तांनी आंबेओहळ प्रकल्पाचे पुर्नवसन न झाल्याने वाहनांच्या आडवे पडून काम बंद पाडले. पुर्नवसन होत नाही तोपर्यंत काम करू नका अशी भूमिका मांडली होती, पण त्यांना न जुमानता दुपारी तीन वाजता प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे कळताच प्रकल्पग्रस्त सांयकाळी आक्रमक झाले.

प्रकल्प अभियंता स्मिता माने, कृष्णा खोरेचे अधिकारी खट्टे, प्रकल्पाचे अधिकारी बारदेस्कर व धरणग्रस्त यांच्यात पुर्नवसन प्रश्नावरून बाचाबाची झाली. धरणग्रस्त आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला.

Web Title: Rehabilitate the victims of the Ambeohal project first and then start the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.