अवैध बसेसवर ‘प्रादेशिक परिवहन’ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 05:48 PM2020-01-29T17:48:53+5:302020-01-29T17:51:02+5:30

अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारत त्या अटकावून ठेवल्या. अशा बसेसमधून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे.

'Regional transport' action on illegal buses | अवैध बसेसवर ‘प्रादेशिक परिवहन’ची कारवाई

कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी अवैध बांधणी असलेल्या १२ बसेसवर कारवाई करीत ही वाहने ताराबाई पार्क येथील कार्यालयात अटकावून ठेवली.

googlenewsNext
ठळक मुद्देअवैध बसेसवर ‘प्रादेशिक परिवहन’चा बडगा अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर कारवाई

कोल्हापूर : अवैध बांधणी असणाऱ्या १२ खासगी आराम बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने बुधवारी कारवाईचा बडगा उगारत त्या अटकावून ठेवल्या. अशा बसेसमधून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी केले आहे.

नागालँड, अरुणाचल प्रदेश, गुजरात, आदी राज्यांमध्ये नोंदणी झालेल्या अवैध बसेस कोल्हापुरात आढळून आल्या आहेत. या बसेस महाराष्ट्राचा कर भरत असल्या तरी त्या वाहनांची लांबी प्रमाणापेक्षा अधिक आहे.

वाहनांचा ओव्हरहँग जास्त आहे. वाहनांमध्ये ३२ ऐवजी ३६ स्लिपर आसने आहेत. या वाहनांची बांधणी नियमबाह्य आहे. अशा वाहनांतून प्रवास करणे धोकादायक आहे; त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा वाहनांवर बुधवारपासून कारवाईस प्रारंभ केला. त्यात १२ वाहनांवर कारवाई करीत ती अटकावून ठेवण्यात आली.

कारवाईत वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रद्द करण्यात आले आहे. कारवाई झालेल्या वाहनांमध्ये वैभव ट्रॅव्हल्स, एम. बी. लिंककक, परिख ट्रॅव्हल्स, संगीता, सनराईज, हर्षाली, नॅशनल, आदींचा समावेश आहे.

कारवाई झालेल्या वाहनांचे क्रमांक असा :
एआर०१ जे ५६८६, एआर ०२ ६०५१, एआर ०१ जे ३००७, एनएल०१ बी १८१४, एनएल०१ बी १७६७, एनएल०१ बी १६१७, जीजे०५ बीव्ही ६९३२, जीजे१४ झेड ७००२, एआर ०१ जे ४९८१, एआर २० ६६६६, एआर ०२ ६०५१ या बसेसचा समावेश आहे.


आपण ज्या खासगी बसेसमधून प्रवास करणार आहात, त्या बसेसचा नोंदणी क्रमांक तपासावा. जर एआर, एनएल, जीजे असा असेल तर त्या वाहनांतून प्रवास करू नये. हा प्रवास धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी या बसेसची तक्रार संकेतस्थळावर करावी.
- डॉ. स्टीव्हन अल्वारिस,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

 

Web Title: 'Regional transport' action on illegal buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.