‘अंबाबाई ’ ला पालकमंत्र्यांचा साष्टांग दंडवत- लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 05:53 PM2019-05-23T17:53:17+5:302019-05-23T18:40:39+5:30

लोकसभा निवडणूकीत राज्यासह देशभरात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्नी अंजली यांच्यासमावेत गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास

Regarding the achievement of the victory in the Lok Sabha elections - The Guardian of the Guardian for 'Ambabai' | ‘अंबाबाई ’ ला पालकमंत्र्यांचा साष्टांग दंडवत- लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ

 लोकसभा निवडणूकीत भाजपाला राज्यासह देशभरात अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरची करवीरनिवासीनी अंबाबाई देवीच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. यावेळी त्यांच्या समावेत पत्नी अंजली व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Next

कोल्हापूर : लोकसभा निवडणूकीत राज्यासह देशभरात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्नी अंजली यांच्यासमावेत गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करवीर निवाासीनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी पाटील यांनी देवीला साष्टांग दंडवत घातला.

पालकमंत्री पाटील यांनी राज्यातील ४८ जागांवर भारतीय जनता पक्ष -शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा पण केला होता. त्यात त्यांना ४२ जागांवर अपेक्षित यश आले. या विजयाच्या प्रित्यार्थ गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. मला असेच यश सदैव दे असे म्हणत देवीला साष्टांग दंडवत घातला. दर्शन घेवून आल्यानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, मी ज्या ज्यावेळी देवीकडे मागितले ते मला त्या त्या वेळी मिळत गेले आहे. मी प्रथम आमदार होतो, तेव्हा मी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नव्हतो. मी देवीचा परमभक्त आहे.

या निवडणूकीतही मी भाजपाचे देशात सरकार येवू दे असे मागणे घातले होते. त्याप्रमाणे निवडणुकीचा निकाल आमच्या पक्षाच्या बाजूने लागला. त्यात मी अपेक्षित केलेले यश आले. त्यानूसार मी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी आलो आहे. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. तत्पुर्वी भाजपा कार्यकर्त्यांनी देशासह राज्यभरात लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ भारतीय जनता पक्षाच्या सबजेल जवळील कार्यालयासमोर गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. यात कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही सहभागी झाले होते.

यावेळी राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई, गोकूळचे संचालक बाबा देसाई, अशोक देसाई, राहूल चिकोडे, अ‍ॅड. संपतराव पवार, माणिक पाटील चुयेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, दिग्विजय कालेकर, तुषार देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 लोकसभा निवडणूकीत भाजपाला राज्यासह देशभरात अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरची करवीरनिवासीनी अंबाबाई देवीच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. यावेळी त्यांच्या समावेत पत्नी अंजली व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 लोकसभा निवडणूकीत भाजपाला राज्यासह देशभरात अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरची करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे पत्नी अंजली यांच्या समावेत गुरूवारी सायंकाळी दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


लोकसभा निवडणूकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल गुरूवारी भाजपा कार्यकर्त्यांनी सबजेल परिसरातील कार्यालयासमोर गुलाल उधळून जल्लोष केला. यात एक मुस्लिम कार्यकर्त्यानेही नृत्यावर ठेका धरला.


लोकसभा निवडणूकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल गुरूवारी भाजपा कार्यकर्त्यांनी सबजेल परिसरातील कार्यालयासमोर गुलाल उधळून व नृत्यावर ठेका धरत आनंद द्विगुणीत केला. यात भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेवक अजित ठाणेकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते.
 

 

Web Title: Regarding the achievement of the victory in the Lok Sabha elections - The Guardian of the Guardian for 'Ambabai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.