क्षीरसागर यांना काँग्रेसकडून ऋतुराज हेच ‘उत्तर’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:14 AM2019-07-16T01:14:07+5:302019-07-16T01:14:51+5:30

विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून शिवसेनेची पकड असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांतून, तसेच राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून ही पकड

Rashtrapaj is the answer to Congress' Kshirsagar? | क्षीरसागर यांना काँग्रेसकडून ऋतुराज हेच ‘उत्तर’ ?

क्षीरसागर यांना काँग्रेसकडून ऋतुराज हेच ‘उत्तर’ ?

Next

भारत चव्हाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर २००४ चा अपवाद वगळता १९९० पासून शिवसेनेची पकड असून, आमदार राजेश क्षीरसागर यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या कामांतून, तसेच राजकीय आंदोलनाच्या माध्यमातून ही पकड अधिकच मजबूत केली आहे. क्षीरसागर यांच्या विरोधात दोन्ही कॉँग्रेसकडून तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरूअसून ऋतुराज पाटील यांचे नाव या स्पर्धेत पुढे आहे. त्यांना उमेदवारी देण्यास काँग्रेसकडून काही अडचण नाही. त्यांनी ती स्वीकारायची की नाही हाच अजून संभ्रम आहे. परंतु सध्या काँग्रेसची स्थिती पाहता त्यांना रिंगणात उतरवले जाईल अशाच घडामोडी आहेत.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेनेचा प्रभाव आहे. ज्या ज्यावेळी शिवसेनेत बंडखोरी झाली किंवा पक्षांंतर्गत छुपा विरोध झाला, त्या त्यावेळी शिवसेना मजबूत होत गेली. १९९० मध्ये प्रथमच निवडून आलेल्या दिलीप देसाई यांनी बंडखोरी करून पक्ष सोडला तेव्हा त्यापुढील निवडणुकीत सुरेश साळोखे यांना मतदारांनी निवडून दिले. २००९ मध्ये प्रथम राजेश क्षीरसागर यांना पक्षाची उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत प्रचंड विरोध झाला. स्वकीयांनी त्यांच्या विरोधात बंड केले. तरीही क्षीरसागर निवडून आले. २०१४ मध्येसुद्धा त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. तरीही क्षीरसागर विजयी झाले. यावेळीदेखील परिस्थिती गतवेळच्या निवडणुकीसारखीच आहे. पक्ष कार्यकर्ते एका बाजूला आणि क्षीरसागर दुसऱ्या बाजूला आहेत. त्यामुळे क्षीरसागर यांनी स्वकीयांवर अवलंबून न राहता स्वत:ची यंत्रणा तयार ठेवली आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना सर्वांत कमी मताधिक्य या मतदारसंघातून मिळाले. अंतर्गत गटबाजीचाच हा परिणाम आहे.मागील निवडणुकीत दुसºया क्रमांकावर राहिलेल्या सत्यजित कदम, मालोजीराजे छत्रपती यांनी पक्षाकडे उमेदवारीच मागितलेली नाही. ऋतुराज पाटील आणि मधुरिमाराजे छत्रपती यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.
ऋतुराज यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरात संपर्क अभियान राबविले आहे. तरुणांचे संघटन केले आहे. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी समन्वय साधला आहे. या मतदारसंघात कसबा बावडा, लाईन बझार या परिसरात सुमारे तीस हजारांवर मतदान आहे. तिथे ऋतुराज पाटील यांना चांगले पाठबळ मिळू शकते. मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीबाबत राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व शाहू छत्रपती यांचे बोलणे झाल्याचा संदर्भही दिला जातो; परंतु ‘न्यू पॅलेस’वरून अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे त्या लढण्याची शक्यता फारच धूसर वाटते.

राष्ट्रवादीकडून २००४ साली मालोजीराजे निवडणूक लढण्यास इच्छुक होते; परंतु मतदारसंघ कॉँग्रेसला गेला. तेव्हा शरद पवार यांनीच मालोजीराजेंना कॉँग्रेसची उमेदवारी दिली आणि हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेल्या सुरेश साळोखे यांचा पराभव केला. तीच खेळी यावेळीसुद्धा खेळली जाण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादी यांच्यात आघाडी होणार हे स्पष्ट असून काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. कोण लढणार नसेल तर माझी लढायची तयारी असल्याचे व्ही. बी. पाटील यांनी जाहीरपणे सांगितले आहे. माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांनी सागर किंवा सचिन या दोघांपैकी एका मुलाचा विचार करावा, असा आग्रह धरला आहे. गतवेळचे कॉँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांनी कॉँग्रेसचा नाद सोडला आहे. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कसलीही मदत न होता, त्यांनी ४७ हजार मते मिळविली होती. याचा अर्थ काँग्रेसला मानणारा निश्चित असा पारंपरिक मतदार शहरात आहे. यंदा त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, ताराराणी पक्षातर्फे निवडणूक लढतील. महापालिकेत ताराराणी आघाडीचे १९ पैकी १७   नगरसेवक ‘उत्तर’मधील असल्याने त्यांच्या जोरावरच कदम निवडणूक लढवू इच्छितात. माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांची ताकद त्यांच्या सोबत राहील.

मागच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मिळवूनदेखील भाजपचे महेश जाधव यांना ४२ हजार मते मिळाली होती. यावेळीदेखील आपण निवडणूक लढविणार असल्याचे ते सांगत आहेत. केवळ उत्तरमध्येच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात भाजपचे कार्यकर्ते निर्माण करण्यात जाधव यांचा पुढाकार आहे. शिवसेनेची युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने आपण लढण्याची तयारी केली असल्याचे ते सांगतात. मंत्री चंद्रकात पाटील काय आदेश देतील त्याचे पालन करायचे, अशीही त्यांची भूमिका आहे. डाव्या पक्षांची ताकद अगदीच क्षीण असल्यामुळे ते भाजप-शिवसेनेच्या विरोधात राहतील. वंचित आघाडीचा उमेदवार रिंगणात असेल; परंतु त्याचे नाव समोर आलेले नाही.


विधानसभा २०१४ च्या निवडणुकीत मिळालेली मते
राजेश विनायक क्षीरसागर (शिवसेना) - ६९ हजार ७३६ (३९.७२ टक्के)
सत्यजित शिवाजीराव कदम (कॉँग्रेस) - ४७ हजार ३१५ (२६.९५ टक्के)
महेश बाळासाहेब जाधव (भाजप) - ४१ हजार ८०० (२२.८४ टक्के)
आर. के. पोवार (राष्टÑवादी) - ९८८७ हजार (५.६३ टक्के)
रघुनाथ कांबळे (भाकप) - १५०४ (००.८६ टक्के)
सुरेश साळोखे (मनसे) - १३७२ (००७८)
इतर चौघांना प्रत्येकी १३०० च्या आत मते


माजी महापौर सागर चव्हाण, प्रदेश सरचिटणीस तौफिक मुल्लाणी, दौलत देसाई हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्टÑवादीकडून व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास इच्छुक आहेत.


कोल्हापूर उत्तर मतदारसंघ

पूर्वरंग

विधानसभा निवडणूक


 

Web Title: Rashtrapaj is the answer to Congress' Kshirsagar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.