गगनबावडयात आढळला दुर्मीळ प्रजातीचा सरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 05:41 PM2021-07-27T17:41:37+5:302021-07-27T17:51:05+5:30

WildLife Gaganbawad Kolhapur :  गगनबावडाच्या सौंदर्यात आणखी एका कीटकवंशी प्राण्याची भर पडली आहे.पदभ्रंमती दरम्यान चामेलियो झेलेनिनिकस या दुर्मिळ किटक प्रजातीचा सरडा आढळला.

Rare species of lizard found in Gaganbawda | गगनबावडयात आढळला दुर्मीळ प्रजातीचा सरडा

गगनबावडयात आढळला दुर्मीळ प्रजातीचा सरडा

googlenewsNext
ठळक मुद्देगगनबावडयात आढळला दुर्मीळ प्रजातीचा सरडाचामेलियो झेलेनिनिकस दुर्मीळ प्रजातीचा सरडा

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड :  गगनबावडाच्या सौंदर्यात आणखी एका कीटकवंशी प्राण्याची भर पडली आहे.पदभ्रंमती दरम्यान चामेलियो झेलेनिनिकस या दुर्मिळ किटक प्रजातीचा सरडा आढळला.

अनेकविध दुर्मीळ पशू, पक्षी, प्राणी यांच्या अस्तित्वासाठी या तालुक्यातील वनसंपदा पोषक ठरते आहे. थंडगार हवा, घनदाट झाडी, तुरळक मानवी वस्ती यामुळे येथे विविध प्राणी , पक्षी , किटक यांचा अधिवास अढळतो. विविध देशामधे अधिवासासाठी परिचीत असणारे पक्षी, प्राणी या तालुक्याच्या निसर्गरम्य परिसरात अढळत असतात. ही या तालुक्याचा निसर्ग संपदेत भर टाकणारी एक दिलासादायक बाब आहे.

हा भारतीय रंगीत सरडा म्हणूनही ओळखला जातो. याला शास्त्रीय भाषेत चामेलियो झेलेनिनिकस या नावाने ओळखले जाते. हा सरडा विशेषतः श्रीलंका,  भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागात आढळणार्‍या सरड्याची एक प्रजाती आहे. इतर सारड्याप्रमाणेच या प्रजातीची जीभ लांब असते. व पायांला दोनच बोटे असतात. त्यांचा आकार चिमट्यासारखा असतो. तो आपल्या शेपटीने फांदीला पकडू शकतो, अशा विशिष्ठ पध्दतीची त्याच्या शेपटीची रचना असते . त्याला इंग्लिशमध्ये (Prehensile Tail) असे म्हणतात . डोळ्यांची स्वतंत्र हालचाल आणि त्वचेचा रंग बदलण्याची क्षमता या सरड्यामध्ये असते. तो आपले डोळ वर ,खाली करत डुलत हळुवारपणे चालतो .

हा सरडा जास्तीत जास्त वेळ झाडावरच असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ते पार्श्वभूमी रंग निवडत नाहीत. ते सरडे सहसा हिरव्या किंवा तपकिरी रंगाचे पट्टे असलेले अढळतात. हा सरडा आपला रंग वेगाने बदलू शकतो . या सरडयाचे रंग बदलण्याचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे इतर सरड्याशी संवाद साधणे आणि उष्णता शोषण्यासाठी गडद रंगात बदलून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे असते . या सरडयाची नाकापासून शेपटीच्या सुरुवाती पर्यंतची लांबी ७ इंच तर शेपूट ८ इंचाची असते .गगनबावडा तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पदभ्रमंती दरम्यान येथील नायब तहसीलदार संजय वळवी, महसूल सहाय्यक विजय पारधी, अवधूत खापणे यांना हा सरडा आढळून आला.

Web Title: Rare species of lizard found in Gaganbawda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.