रामानंदनगर जरगनगर रस्त्याची चाळण.. उंचवटे देताहेत अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 07:34 PM2019-11-10T19:34:53+5:302019-11-10T19:35:32+5:30

या खड्ड्यामुळे वाहनधारकांची समोरासमोर धडक धडक होऊन अपघात झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी येथील प्रवाशांतून व नागरिकातून जोर धरू लागली आहे ....

Ramanandanagar Jarganagar Road Trail .. Invitation to Accident in Highway | रामानंदनगर जरगनगर रस्त्याची चाळण.. उंचवटे देताहेत अपघाताला निमंत्रण

रामानंदनगर जरगनगर रस्त्याची चाळण.. उंचवटे देताहेत अपघाताला निमंत्रण

Next
ठळक मुद्दे वाहनधारक पाठीच्या आजारांनी त्रस्त , दहा वर्षापूर्वी रामानंद नगर जरग नगर च्या रस्त्यावरून जाण्यासाठी लोकांच्या अंगावर शहारे यायचे तशीच पुनरावृत्ती आताच्या रस्त्यांनी लोकांच्यावर येते की काय अशी भीती वाहनचालकांमध्ये व येथील रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे

कोल्हापूर/ पाचगाव :
रामानंदनगर जरगनगर र स्तत्यावर खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे तसेच रस्त्यातील उंचवटे अपघाताला आमंत्रण देताना दिसत आहे याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करूनच ,खड्ड्यातून लोकांना रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. या खड्ड्यामुळे वाहनधारकांची समोरासमोर धडक धडक होऊन अपघात झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत  याकडे  प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी येथील प्रवाशांतून व नागरिकातून जोर धरू लागली आहे .... या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन च्या मेन हॉल वरील उंचवटे दिसत आहेत.

अनेक वेळा वाहनधारकांना खड्ड्यामुळे पाठीचे आजार तसेच धुळी कणांमुळे श्‍वसनाचे आजार जडले आहेत,  रात्रीच्या वेळी रस्त्याशेजारी लाईट नसल्याने खड्ड्यांचा व उंचवटे यांचा अंदाज न आल्याने अनेकजण घसरून पडण्याचे प्रकारही घडले आहेत यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.  या रस्त्यावरून नोकरी कामानिमित्त व शाळा कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्याची संख्या जास्त आहे.  खड्डे चुकवण्याच्या नादात येथे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत अनेक वेळा येथील नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे

 

  • रस्त्याच्या पॅच वर्कचे काम मंजूर असून येत्या आठवडाभरात रस्ता सूस्थितीत करून प्रवाशांसाठी रस्ता खड्डेमुक्त केला जाईल 

- सुनील पाटील नगरसेवक.

  • रामानंद नगर ओढ्या जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे व ड्रेनेज लाईनच्या म्यान हॉल वरील उंचवटे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत असून एखादी मोठी घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालावे.

संतोष जरग सामाजिक कार्यकर्ते जरगनगर


 

Web Title: Ramanandanagar Jarganagar Road Trail .. Invitation to Accident in Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.