राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे - : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:38 PM2019-05-24T13:38:48+5:302019-05-24T13:45:29+5:30

ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकऱ्यांना आवडले नाही.

Raju Shetty should go to Kashi and do the sin: Sadabhau Khot | राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे - : सदाभाऊ खोत

राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे - : सदाभाऊ खोत

Next
ठळक मुद्देट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी पंचगंगा डोहात स्नान करून दुसरी आत्मक्लेश यात्रा काढावीधैर्यशील माने यांचा विजय त्यांनी शेतकºयांना अर्पण केला.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती; परंतु याच शेतकऱ्यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकऱ्यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकऱ्यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी पंचगंगा डोहात स्नान करून दुसरी आत्मक्लेश यात्रा काढावी. काशीला जाऊन गंगेत स्नान करून तेथे पापक्षालन करावे, अशी बोचरी टीका कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.

कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर सदाभाऊ खोत बिंदू चौक येथील भाजप कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्याकरिता आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा विजय त्यांनी शेतकऱ्यांना अर्पण केला.

शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन शेतकरी चळवळीचा विश्वासघात केला. ज्यांनी शेतकऱ्यांचे वाटोळे केले, त्या पक्षांशी शेट्टी यांनी अभद्र युती केली हे शेतकऱ्यांना आवडले नाही. राष्ट्रवादी म्हणजे चोरांच्या आळंदीला जाणारी टोळी आहे अशी टीका त्यांनी केली; पण तेच या चोरांच्या टोळीत सामील झाले. शेतकऱ्यांचा हा अपमान होता, असे सांगत खोत म्हणाले की, शेट्टी यांना व्यक्तिद्वेषाने पछाडले होते. ‘मी’ची बाधा त्यांना झाली होती. शेतकऱ्यांना माझ्यामुळेच न्याय मिळतोय, मी देवाचा प्रेषित म्हणून जन्माला आलोय, अशी त्यांची भावना झाली होती. शेतकऱ्यांनी पराभव केल्यामुळे त्यांनी आता काशीला जाऊन पापक्षालन करावे. त्यांनी गंगेत स्नान करून तेथेच थांबावे. शेट्टी दुसरी आत्मक्लेश यात्रा कधी काढतात याची मी वाट पाहतोय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर आपण वाळव्यातून विधानसभेची निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Raju Shetty should go to Kashi and do the sin: Sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.