कोल्हापूरच्या राजमल्हार व्हटकरला कांस्यपदक-युरोप (बल्गेरिया) येथील जागतिक वुशू तायजीकॉन स्पर्धेत कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 18:00 IST2018-10-03T17:58:46+5:302018-10-03T18:00:26+5:30
बरगस, बल्गेरिया (युरोप) येथे झालेल्या तिसऱ्या जागतिक तायजीकॉन (वुशू) अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या राजमल्हार महेश व्हटकर याने कांस्यपदकाची कमाई केली

कोल्हापूरच्या राजमल्हार व्हटकरला कांस्यपदक-युरोप (बल्गेरिया) येथील जागतिक वुशू तायजीकॉन स्पर्धेत कामगिरी
कोल्हापूर : बरगस, बल्गेरिया (युरोप) येथे झालेल्या तिसऱ्या जागतिक तायजीकॉन (वुशू) अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या राजमल्हार महेश व्हटकर याने कांस्यपदकाची कमाई केली.त्याने ही कामगिरी ४२ किलोगटात तायजीकॉन गट-३ या प्रकारात केली. हाँगकाँगला सुवर्ण, तर रशियाला रौप्य पदकाची कमाई केली. राजमल्हारने कांस्यपदक पटकावित कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
राजमल्हारने कसून तयारी केली होती. यासाठी तिने शाँगडाँग (चीन) येथे एक महिन्याचे अॅडव्हान्स प्रशिक्षण केले. त्याची ही निवड स्पोर्टस आॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) भोपाळ, मध्यप्रदेश येथील सराव शिबिरासाठी प्रवेश मिळवत दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. याचठिकाणी झालेल्या चाचणीतून त्याची या स्पर्धेसाठी निवड झाली. यापूर्वी त्याने राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याला सोपान कटके, सुहेल अहमद, अब्बास किरमाणी, अविनाश पाटील, सतीश वडणगेकर, कृष्णात कांबळे, शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार प्राप्त बिभीषण पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तो केंद्रीय जीएसटीचे अधीक्षक महेश व्हटकर यांचे सुपुत्र, तर माजी आमदार नामदेवराव व्हटकर यांचे पणतू होत.