हातकणंगले येथे जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:18 AM2021-06-21T04:18:13+5:302021-06-21T04:18:13+5:30

हातकणंगले (प्रतिनिधी ) हातकणंगले- पेठवडगाव रोडवरती कुंभोज फाट्याशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार क्लबवर रविवारी दुपारी हातकणंगले ...

Raid on gambling den at Hatkanangle | हातकणंगले येथे जुगार अड्ड्यावर छापा

हातकणंगले येथे जुगार अड्ड्यावर छापा

Next

हातकणंगले (प्रतिनिधी )

हातकणंगले- पेठवडगाव रोडवरती कुंभोज फाट्याशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार क्लबवर रविवारी दुपारी हातकणंगले पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत एका माजी सरपंचासह १२ जणांना ताब्यात घेत ९ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कुंभोज फाट्याशेजारी रस्त्याकडेला एका पत्राशेडमधील जुगार क्लबमध्ये जुगार चालू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत क्लबचालक रमेश भागीनाथ शिंदे ( वय ५७ ), अतुल प्रल्हाद नरुटे ( वय ३८ ), सचिन विकास लादे( वय ४१),संदीप अनिल मोरे ( वय३८), राजकुमार रघुनाथ कोळी ( वय ४९), अनिल रामचंद्र घोलपे( वय ४८ ) सर्व रा.हातकणंगले, संदीप मारुती खरात( वय३८),संदीप देवाप्पा मधाळे ( वय ५४), सुदाम तातोबा कांबळे ( वय ५७ ) तिघेही राहणार आळते, रविराज विनायक कोठावळे ( वय २० ) रा. मजले, किरण सावळा आवळे ( वय २८ ) रा. कोरोची, गणपती परशुराम जाधव ( वय ७७ ) रा. वडगाव अशा १२जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन चाकी, चार कार व जुगाराचे साहित्य असा ९ लाख ४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि सई बडे करीत आहेत.

Web Title: Raid on gambling den at Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.