लॉकडाऊनसंदर्भात राधानगरी आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:26+5:302021-05-15T04:24:26+5:30

जिल्हा प्रशासनाने उद्या शनिवारपासून घोषित केलेल्या लॉकडाऊन संदर्भात राधानगरीत आढावा बैठक झाली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी मार्गदर्शन ...

Radhanagari review meeting regarding lockdown | लॉकडाऊनसंदर्भात राधानगरी आढावा बैठक

लॉकडाऊनसंदर्भात राधानगरी आढावा बैठक

Next

जिल्हा प्रशासनाने उद्या शनिवारपासून घोषित केलेल्या लॉकडाऊन संदर्भात राधानगरीत आढावा बैठक झाली. आमदार प्रकाश आबिटकर यांनी मार्गदर्शन केले. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्राम दक्षता समित्या सक्रिय करण्यासह करावयाच्या अन्य उपाययोजनांबाबत चर्चा झाली.

याबरोबर येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमधील सुविधांची पाहणी करुन आढावा घेण्यात आला. आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तहसीलदार मीना निंबाळकर यांनी प्रशासनाने केलेल्या तयारी बाबत माहिती दिली. उद्या याबाबत पोलीस पाटील, सरपंच,प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांच्या सहभागाबद्दल अवगत करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी या काळात अत्यावश्यक सेवेशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची वाहने जप्त करण्यात येणार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे सांगितले. गटविकास अधिकारी संदीप भंडारी बांधकाम उपअभियंता अमित पाटील, नायब तहसीलदार विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर. आर. शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जी. बी. गवळी, आर. एस. पाटील, जयवंत कोरे, शैलेश मोरस्कर, रंजना लोहार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Radhanagari review meeting regarding lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.